C. Sambhajinagar : आजोबांच्या अंत्यविधीला नातीनेही सोडला जीव; 4 महिन्यांपूर्वीच अडकली होती विवाहबंधनात

अवघ्या चार महिन्यांपूर्वी पूनमचे लग्न पार पडलं होतं. विक्रम तुपे यांच्याशी ती लग्नबंधनात अडकली होती.

जाहिरात
Read Time: 1 min

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरहून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून आजोबाच्या निधनाच्या विरहात नातीचा मृत्यू झाला आहे. सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष नरसिंगराव गायकवाड यांचं त्यांच्या गावी निधन झालं होतं. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. सर्वाधिक त्रास त्यांची लेक 19 वर्षीय पूनम तुपे हिला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंगराव गायकवाड यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती. त्यादरम्यान पूनम हिच्या छातीत दुखू लागले. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नक्की वाचा - Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या आरोपीचा माज कायम; पत्रकार, पोलिसांना केली आरेरावी

अवघ्या चार महिन्यांपूर्वी पूनमचे लग्न पार पडलं होतं. विक्रम तुपे यांच्याशी ती लग्नबंधनात अडकली होती. आजोबांच्या विरहात नातीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. 

Topics mentioned in this article