Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगरकरांचा 30 वर्षांचा संघर्ष संपणार! पाडव्याच्या मुहूर्तावर मोठा दिलासा

संभाजीनगरचा पाणी प्रश्न नेहमी चर्चेत राहिला आहे. आता हीच बहुचर्चित पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन, प्रत्यक्षात संभाजीनगरकरांच्या नळाला पुरेसे पाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis:  छत्रपती संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पूर्ण होणार आहे. भव्य जॅकवेलमध्ये सायफन तंत्रज्ञानाने पाणी घेण्यास सुरुवात होणार असून त्याच वेळी ९०० मिमीची नवीन जलवाहिनीही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासूनचा संभाजीनगरकरांचा पाण्याचा संघर्ष संपणार आहे.

छत्रपती संभाजीनगरकरांसाठी Good News..! 

संभाजीनगरच्या पाणी प्रश्नाची राज्यभर नेहमी चर्चा होत असते, विशेष म्हणजे याच पाणीप्रश्नावर थेट हायकोर्टच रस्त्यावर उतरले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायधीशांनी तब्बल 5 तास पाहणी करत कामाचा आढावा घेतला होता. त्यामुळे संभाजीनगरचा पाणी प्रश्न नेहमी चर्चेत राहिला आहे. आता हीच बहुचर्चित पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन, प्रत्यक्षात संभाजीनगरकरांच्या नळाला पुरेसे पाणी पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Accident News: भाजप प्रवेश करुन परतताना भीषण दुर्घटना; तानाजी सावंत यांचे पुतणे बचावले, महामार्गावर काय घडलं?

शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी, महानगरपालिकेने पाईपलाईनच्या क्षमतेचे सविस्तर मूल्यांकन केले. या तपासणीत असे दिसून आले की, बऱ्याच काळापासून वापरात असलेली ७०० मिमी पाईपलाईन खूपच जुनी आणि जीर्ण झाली होती. त्यामुळे, मोठी, ९०० मिमी पाईपलाईन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील पाण्याची उपलब्धता वाढेल आणि वितरण प्रणाली सुधारेल अशी अपेक्षा आहे.

जायकवाडी धरणातून १०० मिमी पाईपलाईनद्वारे ४२२ हॉर्सपॉवरच्या पंपाच्या साहाय्याने पाणी उचलले जाईल. त्यानंतर या पाण्यावर फारोला जलशुद्धीकरण प्रकल्पात प्रक्रिया करून शहराच्या विविध भागांना पुरवठा केला जाईल. यामुळे अधिक स्थिर आणि पद्धतशीर पाणीपुरवठा सुनिश्चित होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे.

पाणीटंचाईतून मिळणार दिलासा! 

सध्या, शहराला विविध योजनांमार्फत अंदाजे १५० ते १६० एमएलडी पाणी मिळते. यामध्ये, १०० एमएलडी योजनेतून ९५ ते ९८ एमएलडी, ९०० मिमी पाईपलाईनमधून अंदाजे २६ एमएलडी आणि ७०० मिमी पाईपलाईनमधून ३० ते ३५ एमएलडी पाणी मिळत आहे. नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीनंतर, ९०० मिमी पाईपलाईनमधून अंदाजे ७२ एमएलडी पाणी मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे एकूण पाणीपुरवठा १७० ते १७२ एमएलडीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, पाईपलाईनला जोडलेल्या काही ग्रामपंचायतींच्या जोडण्यांवर कारवाई करण्याची तयारीही केली जात आहे.

Weather Update: पुढील 2 दिवस अवकाळी बरसणार! वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा; 'या' जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी

Topics mentioned in this article