ओंकार कुलकर्णी, धाराशिव:
Dhananjay Sawant Accident: माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करुन धाराशिवकडे परतत असताना मध्यरात्री त्यांच्या कारचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघात कोणीही गंभीर जखमी झाले नसून धनंजय सावंत आणि त्यांचे चालक किरकोळ जखमी झाले आहेत.
धनंजय सावंत यांच्या कारचा भीषण अपघात
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिगवणजवळ सोलापूर-पुणे महामार्गावर मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान घडलेल्या भीषण अपघातात माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत थोडक्यात बचावले आहेत. महामार्गावर त्यांच्या फॉर्च्युनर कारला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
मात्र सुदैवाने सावंत सुखरूप असून धनंजय सावंत यांचे पुत्र आणि चालक व सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले आहेत, काल मुंबई येथे धनंजय सावंत यांच्या पत्नी सह समर्थकांनी शिवसेनेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप प्रवेशाचा हा कार्यक्रम आटोपून परतत असताना हा अपघात घडला असून ईश्वराची कृपा आणि कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांमुळेच आपण सुरक्षित असल्याची भावना धनंजय सावंत यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world