Sambhajinagar News:पिल्लांजवळ घुटमळली अन् निघून गेली; एका चुकीमुळे मादी बिबट्याचा पिल्लांना स्वीकारण्यास नकार!

दहा दिवसांपासून मादी बिबट्याने पिल्लांना घेऊन जावं म्हणून प्रयत्न केले जात होते. मात्र आईनेच बछड्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला.

जाहिरात
Read Time: 1 min

Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात बिबट्या धुमाकूळ घालत असल्याचं दिसत आहे. हा बिबट्या लोकांच्या घरात शिरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या सर्व गोंधळादरम्यान मन पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे.

मानवी हस्तक्षेपाचा फटका छत्रपती संभाजीनगर येथील शेतशिवारात सापडलेल्या २२ दिवसांच्या बिबट्यांच्या दोन पिल्लांना बसला आहे. जगण्यासाठी आधार असलेली त्यांची आईच त्यांच्यापासून दुरावली आहे. वन विभागाने प्रयत्न करूनही बिबट्याच्या मादीने त्या पिल्लांचा स्वीकार न केल्यामुळे त्यांची रवानगी नागपूरला करण्यात आली.

नक्की वाचा - Kalyan News : कल्याणच्या मलंग रस्त्यावरुन जायला घाबरतायेत प्रवासी, रात्रीच्या 'त्या' घटनेने परिसरात खळबळ

मादी बिबट्याने पिल्लांना का नाकारलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, बिरोळा आणि जिरी (ता. वैजापूर) शिवारातील काही जणांनी व्हिडिओ करण्याच्या नादात बिबट्याच्या पिल्लांना हाताळले. त्यांच्या शरीरावर मानवी गंध चिकटला आणि त्यामुळे मादी बिबट्यानेच आपल्या पिल्लांना सोबत नेणं नाकारलं. १० दिवस चाललेली प्रतीक्षा, प्रयत्न आणि आशेचा किरण अखेर निष्फळ ठरला. मादी बिबट्या दररोज पिल्ले ठेवलेल्या परिसरात येत होती, त्यांच्याकडे पाहत थांबत होती. परंतु त्यांना उचलून घेऊन जात नव्हती. पिल्लांच्या अंगावर मानवी वास टिकून राहिल्याने आईने त्यांना ओळखण्यास नकार दिल्याचे वनकर्मचाऱ्यांने सांगितले.

Advertisement