Sambhajinagar most expensive goggles : छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकूल समितीच्या (Chhatrapati Sambhajinagar Divisional Sports Complex Scam) खात्यात झालेल्या 21.59 कोटींच्या घोटाळा प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत आहे. या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागर (Harsh Kumar Kshirsagar) हा वेव मल्टिसर्व्हिसेस या कंपनीकडून कंत्राटी लिपिक म्हणून क्रीडा विभागात कार्यरत होता. या हर्षकुमारबद्दल अवाक् करणारी माहिती समोर आली आहे. जगातील सर्वात महागड्या पाच गॉगलपैकी एक भारतात आहे आणि हा गॉगल 13 हजार रुपये पगार घेणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागरकडे आहे. या पठ्ठ्याने जर्मनीहून 16 लाखांचा गॉगल मागवला होता. या गॉगलला 180 हिरे लावले असून त्याची फ्रेम प्लॅटिनम धातूची आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी लिपिक पदावर काम करणारा कर्मचारी हर्षकुमार क्षीरसागर याने 21 कोटींचा घोटाळा केला आहे. या पैशांमधून त्याने प्रेयसीसाठी एअरपोर्ट रोडवर लग्झरी फ्लॅट खरेदी केला. स्वत:साठी बीएमडब्यू कार आणि बाईक खरेदी केली. पोलिसांनी सांगितलं की, 23 वर्षी हर्षकुमार क्षीरसागर संभाजीनगर क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक म्हणून काम करीत होता. त्याला 13 हजार पगार आहे. त्याने या वर्षी 1 जुलैपासून 7 डिसेंबरदरम्यान क्रीडा विभागात 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपये इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून 13 खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. त्याने सहकारी यशोदा शेट्टी आणि त्याचे पती बीके जीवन यांच्यासोबत मिळून हा घोटाळा केला.
नक्की वाचा - Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!
बँक खात्यातून 59 कोटींची हेराफेरी...
राज्य सरकारने संभाजीनगर क्रीडा विभागात मैदान निर्मितीसाठी पैसे पाठवले होते. इंडियन बँकेते क्रीडा विभागाने खातं उघडलं होतं. या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या स्वाक्षरीच्या धनादेशाद्वारे करण्यात आले होते. उपसंचालकांना तब्बल सहा महिन्यांनी या घोटाळ्याची माहिती मिळाली.
कसा केला घोटाळा?
- आरोपी हर्षकुमारने क्रीडा विभागाच्या जुन्या लेटरहेडचा वापर करीत बँकेला इमेल केलं.
- यात त्याने क्रीडा विभागाच्या अकाऊंटशी संबंधित इमेल एड्रेस बदलल्याची विनंती केली
- यानंतर जुन्या इमेल एड्रेसशी जुळत असलेला नवा इमेल एड्रेस तयार केला, ज्यात केवळ एक शब्द बदलला होता.
- हर्षकुमारने इमेलच्या मदतीने बँक अकाऊंटमध्ये इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू केली.
- ज्यानंतर अकाऊंटहून व्यवहार करण्यासाठी आवश्यक ओटीपी आणि अन्य माहिती याच इमेलवर येऊ लागली.
नक्की वाचा - Pregnant Woman Thrown : गर्भवती महिलेला धावत्या ट्रेनमधून फेकले, तामिळनाडूतील संतापजनक घटना
आरोपीची संपत्ती किती होती?
अवघे 13 हजार पगार असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरने अवघ्या 11 महिन्यांत क्रीडा विभागात कंत्राटी लिपिक असूनही 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपये लंपास केले. आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याने 1.20 कोटींची बीएमडब्ल्यू कार, 1.30 कोटींचा एसयुव्ही आणि 32 लाखांची बीएमडब्ल्यू बाईक खरेदी केली. याशिवाय आपल्या प्रेयसीसाठी विमानतळाजवळ चार बीएचके फ्लॅट खरेदी केला.