जाहिरात

Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!  

लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!  

Girl Heart Attack at Marriage : गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. बदलत्या लाईफस्टाईलनुसार आजारांच्या लक्षणांमध्येही बदल होत असल्याचं चित्र आहे. आतापर्यंत हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी काही लक्षणं दिसून येतात. तर पहिले दोन हार्टअटॅक नॉर्मल असतात तर तिसरा हार्टअटॅक गंभीर मानला जातो. मात्र गेल्या काही दिवसातील घटना पाहिल्या तर कोणत्याही लक्षणांशिवाय हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येतो आणि मृत्यू ओढवतो. लग्नातील या व्हिडिओंमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परिणीका नावाची तरुणी आपल्या बहिणीच्या संगीत सोहळ्यात स्टेजवर डान्स करीत होती. यासाठी ती मध्यप्रदेशातील विदिशा येथे आली होती. ही घटना शनिवारी रात्री उशीरा घडल्याची माहिती आहे. ती स्टेजवर आनंदात नाचत होती. मात्र नाचता नाचता ती अचानक खाली कोसळली आणि बेशुद्ध झाली. या तरुणीला डान्स करीत असताना हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. 

Pune News : पिझ्झाची ऑर्डर केली म्हणून विद्यार्थिनींना वसतिगृहातून काढलं बाहेर, पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार 

नक्की वाचा - Pune News : पिझ्झाची ऑर्डर केली म्हणून विद्यार्थिनींना वसतिगृहातून काढलं बाहेर, पुण्यातून आणखी एक धक्कादायक प्रकार 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसोहळ्यात उपस्थित नातेवाईकांपैकी एक डॉक्टर होते. त्यांनी मुलीला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच हालचाल झाली नाही. मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, परिणीता बहिणीच्या लग्नामुळे खूप आनंदी होती. तिचं एमबीएपर्यंतच शिक्षण पूर्ण झालं असून सध्या ती खासगी कंपनीत नोकरी करते. तिचा नाचायची आवड आहे. लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: