2 days ago

आज देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. यानिमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर मोठी तयारी करण्यात आली आहे 

Feb 19, 2025 22:40 (IST)

Shiv Jayanti 2025: बदलापूरमध्ये शिवरायांची आरती

 बदलापूर शहरात उल्हास नदीकिनारी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. यानंतर बुधवारी शिवजयंतीचं औचित्य साधून शिवरायांची महाआरती याठिकाणी करण्यात आली. यावेळी आमदार किसन कथोरे, बदलापूर पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्यासह हजारो बदलापूरकर उत्स्फूर्तपणे उपस्थित होते. या महाआरतीच्या माध्यमातून लोक एक विचार घेऊन जातील, असं मत यावेळी आमदार किसन कथोरेंनी व्यक्त केलं, तर माझ्या आजवरच्या सर्व्हिसमधील हा सर्वोच्च क्षण आणि अनुभव असल्याच्या भावना मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

Feb 19, 2025 22:18 (IST)

Live Updates: शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे निधन

राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक तुकाराम धुवाळी यांचे निधन झाले आहे. गेल्या 53 वर्षांपासून ते शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. तुकाराम धुवाळी यांच्या निधनानंतर शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

मी 1972 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाल्यापासून ज्यांनी माझ्या स्वीय सहाय्यकाची जबाबदारी स्वीकारली ती तुकाराम धुवाळी यांनी. आणि हि जबाबदारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहून सांभाळली. अतिशय विश्वासू, प्रामाणिक व सचोटीने वागणारा, नीगर्वी तसंच सतत हसतमुख असणारा, प्रत्येक व्यक्तीशी आदरानं वागणारा, प्रत्येकाचं काम पूर्ण होण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणारा, अशा निराळ्या सहकाऱ्याचं देहावसान झालं याचं मला अत्यंतिक दु:ख होतंय.

आपल्या कामाचा व्याप जसा वाढत जातो तेव्हा अशी काही माणसं जवळ असावी लागतात की ज्यांच्या सहकार्याने आपण निश्चिंतपणे वेगवेगळ्या प्रकारची कामं करु शकतो. त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते निश्चिंतपणे, प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यात आपल्याला मागे वळून पाहावं लागत नाही, अशातीलच धुवाळी होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबातील एक व्यक्ती गेल्याचं दु:ख होतंय. त्यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो.

Feb 19, 2025 22:14 (IST)

Live Updates: बालाघाट येथे चकमक, 4 नक्षलवादी ठार

मध्य प्रदेशातील बालाघाट येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले. त्यापैकी तीन महिला आहेत.   कान्हा किसली राष्ट्रीय उद्यानातील मुक्की परिसरात ही चकमक घडली.   पोलिसांनी चार नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.   

काही नक्षलवादी जखमी होऊन जंगलात लपले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.  परिसरात शोध मोहीम सुरू आहे. ही चकमक पोलिसांसाठी एक मोठे यश आहे   ठार झालेल्या तीन नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे.   त्या सर्वांची ओळख आशा, प्रमिला आणि करिश्मा अशी झाली आहे, त्या कान्हा भोरंडिओ दलाच्या सक्रिय सदस्या आहेत.   चौथ्या नक्षलवाद्याचे नाव अद्याप समजलेले नाही. या चकमकीनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.   नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिस सतत मोहिमा राबवत आहेत

Feb 19, 2025 21:25 (IST)

Live Updates: ठाणे एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, त्याला कुणी हलवू शकत नाही - प्रताप सरनाईक

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, गेल्या अनेक वर्षात अनेक लोक आले आणि गेले तरी ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्लाच राहिलाय, हा आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे त्याला कुणी हलवू शकत नाही. असे विधान राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलय. मागील काही दिवसांत भाजप ज्येष्ठ नेते मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेण्याची भूमिका घेतलीय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस देखील ठाणे महापालिकेत आगामी काळात लक्ष देण्याच्या तयारीत आहे. याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रताप सरनाईक यांनी हे विधान केले आहे. कोणीही मंत्री कुठेही जनता दरबार घेऊ शकतो, माहितीने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवायला जर त्यांनी जनता दरबार घेतला तर काही चुकीचे नाही वावग नाही असेही सरनाईक म्हणालेत.

Advertisement
Feb 19, 2025 21:16 (IST)

MNS News: उद्या मनसेची बैठक, राज ठाकरे करणार मार्गदर्शन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्या मुंबईतील मनसेच्या विभाग अध्यक्ष,शाखाध्यक्ष यांची बैठक बोलावली आहे 

उद्या सायंकाळी 6 वाजता सावरकर सभागृह दादर येथे बैठक 

27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्क मैदान येथे मनसे कडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे 

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बैठक असल्याची माहिती

Feb 19, 2025 21:12 (IST)

Jalgaon News: मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पीएचे व्हॉट्सॲप हॅक

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे खाजगी स्वीय सहाय्यक गोविंद पाटील यांचे व्हाट्सअप हॅक 

कॅबिनेट मंत्र्यांच्या खाजगी स्वीय सहाय्यकाचे व्हाट्सअप हॅक झाल्याने उडाली मोठी खळबळ

गोविंद पाटील यांचे व्हाट्सअप हॅक करून अनेकांना पाठवल्या जात आहेत शासकीय योजनांच्या लिंक 

गोविंद पाटील यांच्या व्हाट्सअप नंबर वरून कोणाला शासकीय योजनांच्या लिंक किंवा काही मागणी करण्यात आल्यास त्यावर कुठलाही प्रतिसाद न देण्याचे गोविंद पाटील यांनी केले आवाहन 

व्हाट्सअप हॅक प्रकरणी गोविंद पाटील मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याची माहिती

Advertisement
Feb 19, 2025 19:28 (IST)

Pune News: पुण्यात GBS मुळे आणखी एक मृत्यू, 26 वर्षीय तरुणाने गमावला जीव

पुण्यात GBS मुळे आणखीन एक मृत्यू 

पुण्यातील नांदेड सिटी मध्ये राहणाऱया २६ वर्षीय तरुणाने GBS मुळे गमावला जीव 

GBS ची लागण झाल्याने २५ जानेवारी रोजी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात या तरुणाला दाखल करण्यात आलं होतं 

काल संध्याकाळच्या सुमारास या तरुणाचा झाला मृत्यू 

पुण्यात GBS मुळे मृत्यूचा  आकडा ११ वर 

आज सकाळीच एका तरुणीने पुण्यात GBS मुळे गमावला होता जीव

Feb 19, 2025 19:27 (IST)

Shiv jayanti 2025: शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस लाल किल्ल्यावर दाखल

आग्रा किल्ल्यावर ऐतिहासिक शिवजयंती साजरी होणार आहे. या शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाल किल्ल्यावर दाखल झालेत. 

Advertisement
Feb 19, 2025 19:04 (IST)

Mumbai Agra Highway Accident: वाळूने भरलेल्या भरधाव ट्रकने एकाला चिरडले, दोन्ही पाय निकामे

मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या शिरपूर जवळ एका वाळूने भरलेला भरधाव ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने सदर ट्रकने रस्त्यावरील एकाला जोरदार धडक देत ट्रक दुकानात जाऊन धडकला आहे... यावेळी झालेल्या अपघातात संजय पवार हे आपल्या दुचाकीने घरी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे... या भीषण अपघातात संजय पवार यांचे दोघी पाय हे निकामी झाल्या असून त्यांची प्रकृतीही चिंताजनक आहे. तर अन्य दोन जण या घटनेमध्ये बाल-बाल बसवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सदर अपघाताची घटना ही सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून सदर ट्रक हा पूर्णपणे वाळूने भरला होता व ब्रेक फेल झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रत्यक्ष दर्शनी व्यक्त केला आहे.

Feb 19, 2025 19:00 (IST)

Live Updates: दुर्दैवी घटना! अंबरनाथच्या जीआयपी धरणात तरुण बुडाला

अंबरनाथच्या जीआयपी धरणात तरुण बुडाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. सुरज चौहान असं त्याचं नाव असून तो अंबरनाथ पूर्वेच्या मोतीराम पार्क, भवानी चौक परिसरात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो.

व्हीओ : सुरज हा त्याच्या दोन ते तीन मित्रांसोबत जीआयपी धरणावर आला होता. तिथे पाण्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तो बुडाला. याबाबत पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी धरणावर धाव घेत सुरजचा शोध सुरू केला. मात्र बुधवारी दिवसभर शोध घेऊनही सुरज सापडलेला नाही. त्यामुळं आज शोधकार्य थांबवण्यात आलं असून उद्या पुन्हा शोधकार्य सुरू केलं

Feb 19, 2025 18:59 (IST)

Beed News: परळी औष्णिक विद्युत केंद्राला दणका! बँक खाते जप्त करण्याचे आदेश

बीडच्या अंबाजोगाई दिवाणी न्यायालयाने परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रा बाबत अत्यंत महत्त्वाचा आदेश दिला आहे. या आदेशानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे बँक ऑफ महाराष्ट्रचे बँक खाते जप्त केले जाणार आहे. परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी 250 मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करण्यात आल्या होत्या. 

मात्र शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा अत्यल्प दिल्याने शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यानुसार न्यायालयाने 2022 मध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा मंजूर केला होता. हा मावेजा संबंधित शेतकऱ्यांना विद्युत निर्मिती केंद्राकडून देण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात वसुली अर्ज दाखल केला होता. यावर सुनावणी करत परळीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापकांना पुढील आदेशापर्यंत हे खाते जप्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. 

Feb 19, 2025 18:21 (IST)

Live Update : पुण्यात पोलिसाला बेदम मारहाण

कोम्बिंग ऑपरेशनहून परत येत असताना पोलिसाला  चार जणांनी मारहण केल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणात चतु:शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. रूपेश मांजरेकर, अनिकेत घोडके, आणि अभिजीत डोंगरे असे अटक केलेल्या आरोपींचे नावं आहेत. 

Feb 19, 2025 17:17 (IST)

ICC Champion's Trophy 2025: न्यूझीलंडचं मॅचमध्ये कमबॅक, Will Young ची सेंच्युरी

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या विल यंगनं (Will Young) सेंच्युरी झळकावली आहे. कराचीमध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. टॉप ऑर्डरमधील तिघांना मोठा स्कोर करता आला नाही. पण, यंगनं एक बाजू लावून धरत वन-डे कारकिर्दीमधील चौथी सेंच्युरी झळकावली. 

Feb 19, 2025 16:58 (IST)

Delhi News: शरद पवार आणि संजय राऊत येणार एकाच मंचावर

संजय राऊत आणि शरद पवार पहिल्यांदाच एका मंचावर

शरद पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर संजय राऊत आणि पवार एकत्र 

दिल्लीत होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात दोन्ही नेते एकाच मंचावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केल्यावर संजय राऊत यांनी केली होती जोरदार टीका

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणार कार्यक्रम

दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

Feb 19, 2025 16:14 (IST)

Anjali Damania: IFFCO मध्ये मोठा घोटाळा, धनंजय मुंडेंना कोणतेच मंत्रिपद देऊ नका: अंजली दमानिया

 जागतिक स्तरावर सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था IFFCOमध्ये घोटाळा झाला आहे. यामागे धनंजय मुंडेंचा हात असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होत नाही, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.  तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्यावर आतातरी कारवाई करावी, असे म्हणत धनंजय मुंडे मंत्रिमंडळाबाहेर गेल्याशिवाय बीड प्रकरणातही तपास होणार नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. 

Feb 19, 2025 15:25 (IST)

Nashik News: नाशिकच्या उमराण्यात हत्तीवरून मिरवणूक, ध्वजधारी विद्यार्थ्यांचा सहभाग

नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे हत्तीवरून छत्रपती शिवरायांची थाटात मिरवणूक काढण्यात आली.जाणता राजा मित्र मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माध्यमिक शाळेचे लेझीम पथक, ऐतिहासिक शिवकालीन वेशभूषेतील भगवी वस्त्रे, भगवे ध्वज हाती घेतलेल्या विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या  संख्येने सहभागी झाले होते.बारा बलुतेदार व अठरा पगड बहुजन समाजाच्या वतीने तसेच गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Feb 19, 2025 15:24 (IST)

Shivjayanti 2025: पानावर कोरले शिवराय,अनोख्या कलेतून महाराजांना आगळं-वेगळं अभिवादन

शंतनु यांनी पिंपळाच्या नाजूक पानावर छत्रपती शिवाजी महाराजांची अत्यंत देखणी प्रतिमा कोरली आहे. त्यांच्या या कलेचं सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे शंतनु यांनी कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता केवळ स्वाध्यायाच्या जोरावर ही कला आत्मसात केली आहे.

शंतनु देशमुख यांनी याआधी केळीच्या पानावर, पिंपळाच्या पानावर आणि खडूवर देखील अनेक देव, देवी आणि महापुरुषांचे लिफआर्टद्वारे अप्रतिम चित्र रेखाटली आहेत. त्यांच्या हाताच्या कुशलतेमुळे आता ते संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

Feb 19, 2025 15:09 (IST)

Live Update : छत्तीसगडमधील जहाल नक्षल कमांडरच्या यवतमाळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या

छत्तीसगड राज्यातील नक्षल दलम कमांडरच्या मुसक्या आवळण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने तब्बल दीड महिन्याच्या मागोव्यानंतर येथील लकडगंज परिसरात केली. या कारवाईने पुन्हा एकदा वणी तालुकाच नव्हेतर जिल्ह्याचे केंद्र असलेले यवतमाळ मुख्यालय हे नक्षल्यांसाठी रेस्ट झोन असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे असे म्हटल्यास हरकत नाही.

Feb 19, 2025 15:07 (IST)

Live Update : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची शिवजयंतीच्या निमित्ताने भवानी तलवार अलंकार महापूजा

आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात देखील शिवजयंतीच्या निमित्ताने तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा करण्यात आली. स्वराज्य निर्माण करण्यासाठी  छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने भवानी तलवार दिली अशी धारणा आहे, त्याची आठवण म्हणून दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी या रुपामध्ये देवीची विशेष उत्सव पूजा मांडली जाते. 

Feb 19, 2025 13:16 (IST)

Live Update : अकोल्यात क्रिकेट सट्टा बाजारावर सर्वात मोठी कारवाई; 33 आरोपींना अटक

अकोलेच्या पोलिसांकडून क्रिकेट सट्ट्यावर बेमालूमपणे पैसे लावणाऱ्या सटोडीयांव स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मंगळवारी रात्री मोठी कारवाई केली. अकोल्याच्या एमआयडीसी परिसरातील एका आलिशान फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या या सट्टा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने या रॅकेटचा भांडाफोड केला. सध्या सुरू असलेल्या महिला आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान हा सट्ट्याचा व्यवहार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारवाईत 33 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींचे लागेबांधे परदेशातील नेटवर्कशी असल्याचे समोर आली आहे.  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुढील तपास करत असून या प्रकरणात आणखी काही मोठी नावे उघड होण्याची शक्यता आहे.

Feb 19, 2025 11:59 (IST)

Live Update : म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये धडक

म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टरमध्ये धडक 

अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली  

अपघातात 16 जण किरकोळ जखमी. यामध्ये पुरुष, महिला जखमी, जखमी मध्ये लहान मुलांचाही समावेश...

मीरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू 

सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही.

Feb 19, 2025 11:29 (IST)

Live Update : लोअर परेल PVR मध्ये छावा चित्रपटाचा शो अचानक थांबल्याने नागरिकांमध्ये संताप

पीव्हीआर सिनेमा लोअर परेल येथे छावा चित्रपटाचा शो अचानक थांबल्याने नागरिकांमध्ये संताप दिसून आला

शो सकाळी 8:30 चा होता. मात्र चित्रपट सुरू होताच काही मिनिटांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आवाज स्पष्ट ऐकू येत नव्हता

तीन स्क्रीन बदलून देखील तोच बिघाड झाल्याने नागरिकांमध्ये संताप दिसून आला आहे

घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहेत

Feb 19, 2025 09:54 (IST)

Live Update : शिवजयंतीनिमित्त आज पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल

शिवजयंतीनिमित्त आज पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी आज रस्ते बंद असणार आहेत. ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. पदयात्रेनिमित्त सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मध्य भागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मिरवणुकीची सांगता होईपर्यंत मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल लागू राहणार आहेत

Feb 19, 2025 09:41 (IST)

Live Update : महाराजांचे किल्ले हे आमच्यासाठी मंदिरापेक्षा मोठे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवराय हे आपले अराध्य दैवत, राजांनी स्वत: करता काही केलं नाही. जे काही केलं ते सर्व रयतेकरता केलं. महाराजांचे किल्ले हे आमच्यासाठी मंदिरापेक्षा मोठे आहेत. महाराजांच्या किल्ल्यावरील सर्व अतिक्रमणे आपण काढून टाकत आहोत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Feb 19, 2025 09:40 (IST)

Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला 

मुख्य निवडणूक आयुक्त पदाची स्वीकारली सूत्र

जानेवारी 2029 पर्यंत ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ

त्यांच्या कार्यकाळात 20 राज्यांच्या विधानसभांच्या होणार आहेत निवडणुका

Feb 19, 2025 09:38 (IST)

Live Update : मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मिलिंद रेगेंचं निधन, अजिंक्य नाईकची भावनिक पोस्ट

Feb 19, 2025 08:37 (IST)

Live Update : अमेरिकेत शिवजयंती उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा

अमेरिकेत शिवजयंती उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमध्ये शिवरायांचा पुतळा उभारण्याची घोषणा 

- गेल्या 12 वर्षांपासून छत्रपती फाऊंडेशन न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर व भारतीय दूतावासात शिवजयंती साजरी केली जाते. 

- न्यूयॉर्क शहरात शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्याची घोषणा 

- अमेरिकेतील 10 राज्यामधील 350 च्या वर शिवभक्त सहभागी.

Feb 19, 2025 08:32 (IST)

Live Update : मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोहर्डी फाट्याजवळ ट्रकचा अपघात

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या बोहर्डी फाट्याजवळ मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक पलटी होऊन अपघात झाला असून या अपघातात ट्रकचालक हा जागीच ठार झाला आहे. नागपूरकडून लोखंडी पाईप घेऊन गुजरातकडे येत असतांना बोहर्डी फाट्याजवळ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असून अपघातामुळे मुक्ताईनगर भुसावळ दरम्यान महामार्गावरील एकेरी वाहतूक काही का विस्कळीत झाली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Feb 19, 2025 08:31 (IST)

Live Update : आग्र्यातील किल्ल्यात शिवजयंती उत्सवानिमित्ताने विकी कौशलची प्रमुख उपस्थिती

राज्यभरात शिवजयंती साजरी होत असताना सलग तिसऱ्या वर्षी आग्रा येथील किल्ल्यात देखील शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे किल्ल्यातील जहाँगीर महाल या ऐतिहासिक स्थळी यंदा शिवजयंतीचा विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या शिवजयंती सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटातील छत्रपती संभाजीराजेंची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Feb 19, 2025 08:21 (IST)

Live Update : शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरीवर दाखल

शिवजयंती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री  शिवनेरी किल्ल्यावर दाखल 

Feb 19, 2025 08:19 (IST)

Live Update : मालवणात शिवपुतळ्याच्या पायाभरणीचा राजकोट किल्ल्यावर आज होणार शुभारंभ

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीच्या कामास वेग आला आहे.

आज शिवजयंती दिनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आणि खासदार नारायण राणे, आमदार दिपक केसरकर, निलेश राणे यांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी चबुत-याला फुलांची सजावट करण्यात आली आहे. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती योद्ध्याच्या वेषभूषेतील 60 फुटी पुतळा येथे उभारण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर यापूर्वी उभारलेला पुतळा कोसळल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन या पुतळ्याचे स्ट्रक्चर पूर्णतः स्टेनलेस स्टीलचे असून ब्रॉन्झ धातू मधील हा पुतळा बनवला जात आहे.

Feb 19, 2025 07:47 (IST)

Live Update : शिवाजी पार्कात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास राज्यपालांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दादर छत्रपती शिवाजी पार्क येथे असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास माहिती तंत्रज्ञान सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार मंगल प्रभात लोढा तसेच स्थानिक आमदार खासदार उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला सुंदर फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.