
Shiv Jayanti 2025 : शिवजयंती दिवशी काल 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरी गडावर तयार करण्यात आलेलं हेलिपॅड आता वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. या हेलिपॅडवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis helicopter), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही त्या हेलिकॉप्टरमध्ये होते. या हेलिकॉप्टरला लँडिंग करताना हेलिपॅड भोवती जे सुरक्षेकरिता बॅरिकेड्स उभारण्यात आले होते, त्यामुळे धोका निर्माण झाला होता. यामुळे काही वेळ ही हेलिकॉप्टर हवेत स्थिरावल्याच हेलिकॉप्टर लँडिंगच्या दृश्यांमधून दिसून येत आहे.
पायलटने सावधानता बाळगून पश्चिमेकडून आलेल्या हेलिकॉप्टरची दिशा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे केली आणि ही हेलिकॉप्टर सुरक्षितरित्या लँडिंग करण्यात आलं. हेलिकॉप्टर उतरल्यावर पायलटने हे सबंधित विभागाला सूचित करून ही गंभीर चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर हे बॅरिकेड्स हटविण्यात आले. याआधी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंग वेळी दुर्घटना होता होता टळली आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या बेजबाबदार नियोजनावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
नक्की वाचा - Devendra Fadnavis मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा
पाच वेळा बचावले मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या सात वर्षात पाच वेळा अशा हेलिकॉप्टर दुर्घटनेपासून बचावले आहेत.
- गडचिरोली येथे 2017 च्या दौऱ्यात
- 2018 मध्ये भाईंदर येथे हेलिकॉप्टर अपघातावेळी
- अलिबाग येथे हेलिकॉप्टर लँड करताना..
- 2019 मध्ये रायगडमध्ये लँडिंग करताना
- 2023 मध्ये जामनेरला उड्डाणाआधी पायलट दक्ष असल्याने दुर्घटना टळली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world