Chitale fake bakarwadi : अहाहा...काही पदार्थ असे असतात की, जे खाल्ल्यावर केवळ ही तीनच अक्षरं तोंडातून निघतात. पुण्यातील बाकरवडी त्यापैकी एक. तिखट, गोड अन् कुरकुरीत बाकरवडी पुणेकरांसह अनेकांसाठी प्रेम आहे. परदेशात जातानाही अनेक जणं आवर्जुन बाकरवडी सोबत घेऊ जातात. मग मराठी असो वा हिंदी भाषिक. यात जाती-धर्माचा भेद नाहीत. मात्र बाकरवडीच्या नावाखाली बाजारात बनावट बाकरवडी मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या एक वर्षापासून पुण्यात “चितळे स्वीट होम” या नावाने बाजारात बनावट बाकरवडी मिळत असल्याचं समोर आलं आहे. त्याहून आश्चर्याची गोष्ट म्हणजे खऱ्या चितळे बंधूंची माहिती म्हणजे कस्टमर केअर नंबर, ईमेल आयडी, मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स हे सर्वच त्या बनावट पाकिटावर छापले होते. हा सगळा प्रकार एक वर्षापासून सुरू होता.
नक्की वाचा - Pune Crime : खायला देण्यावरुन सोसायटीत वाद; 12 श्वानांना संपवण्याचा प्लान, तिघे दगावले
बाकरवडीसंदर्भात अनेक तक्रारी चितळे बंधूंना येत होत्या. जेव्हा मार्केटमध्ये याचा शोध घेतला तेव्हा चितळे स्वीट होम नावाने एक प्रोप्रायटरशिप चालवत असल्याचं समोर आलं. हा प्रोप्रायटरशिप पुण्यातील सदाशिव पेठ भागातातील आहे. या सगळ्या प्रकारामध्ये आरोपीच आडनाव चितळे आहे. गेल्या काही दिवसांपासून बाकरवडीच्या चवीत बदल झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात होत्या. त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला.