- Cidcoच्या 'माझ्या पसंतीचे घर' योजनेसंदर्भातील बैठक पुन्हा रद्द केली आहे
- गेल्या तीन महिन्यांत पाच वेळा बैठक रद्द
- बैठकीत सिडकोच्या घरांची किंमत कमी करण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता होती
DCM Eknath Shinde CIDCO Meeting News: सिडको च्या 'माझ्या पसंतीचे घर ' योजनेतील सोडत विजेत्यांमागील दुर्दैवाचा फेरा काही सुटेल असे दिसत नाही. आज दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी नगर विकास खात्याने आयोजित केलेली बैठक पुन्हा एकदा रद्द केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली. गेल्या तीन महिन्यात पाचव्यांदा बैठक आयोजित करून ती रद्द करण्यात आली आहे असे सिडकोच्या 'माझ्या पसंतीचे घर ' योजनेतील सोडत विजेते संदीप जेठे यांनी म्हटले आहे.
सिडकोची बैठक पुन्हा रद्द
समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतची सिडकोची बैठक पाचव्यानंदा कॅन्सल झाली आहे. याविषयी लक्षवेधी मार्फत विधान परिषदेत सिडको सोडत धारकांच्या किमतीचा प्रश्न विचारणारे दोनही आमदार म्हणजेच भाजपाचे विक्रांत दादा पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे बैठक लावण्याबाबत आग्रही आहेत.
CIDCO News: ऑनलाइन अर्ज नोंदणीतल्या अडचणी दुर होणार? 4,508 घरांसाठी 2 दिवसात किती अर्ज?
गेल्या पाच बैठका केवळ नगर विकास खात्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीमुळे कॅन्सल केल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्व सिडको सोडत धारकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांच्या मोठ्या सभांकडे लक्ष दिले तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथज शिंदे, खासदार नरेश मस्के उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वेगवेगळ्या मंचावर सिडकोच्या किमती अतिशय जास्त असून त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे बोलून दाखवले आहे.
एकनाथ शिंदेंवर नाराजी
असे असताना गेल्या नऊ महिन्यापासून प्रतीक्षेत असलेल्या सिडको सोडक धारकांचा किमतीचा प्रश्न केवळ एका बैठकी अभावी अधांतरित राहिला आहे. आणि ही एक बैठक घेण्यासाठी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वेळ नाही का? असा प्रश्नही सिडको सोडत धारक विचारत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावर सिडको अधिकाऱ्यांचा कुठला दबाव आहे का? याबद्दल आता खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच पुढे येऊन क्लॅरिटी देणे गरजेचे आहे अशी सिडको सोडत धारकांची मागणी आहे. तसेच मुळात सरकारचा किंमत कमी करण्याचा इरादा आहे की नाही ? असे थेट प्रश्न देखील सिडको सोडत धारक विचारत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world