सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या सिडको योजनेतील घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या आहेत. हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र प्रत्यक्षात या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. सिडकोच्या माध्यमातून लोक आपलं स्वप्न पूर्ण करीत असतात.
अखेर वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली येथील पसंतीच्या घरांच्या किमती अखेर जाहीर झाल्या आहेत. सिडकोने सांगितल्यानुसार, नवी मुंबईतील 67,000 घरांपैकी 25,000 परवडणाऱ्या घरांची घोषणा करण्यात आली असून याची ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. आपल्याला परवडणाऱ्या घरांच्या किमती पाहून नागरिक नोंदणी करू शकतात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आतापर्यंत तीन वेळा ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदतवाढ करण्यात आली असून 10 जानेवारी 2025 पर्यंत अंतिम मुदत आहे.
गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक - कार्पेट 322 )
तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख
तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख
खारघर बस डेपो, सेक्टर 14 - 48. 3 लाख
खारकोपर 2A - 38.6 लाख
खारकोपर 2B - 38.6 लाख
कळंबोली बस डेपो - 41.9 लाख
बामणडोंगरी -31. 9 लाख
नक्की वाचा - Eurasian Coot : युरेशियन कूट नावाच्या पक्षाला 'वारकरी' का म्हणतात? नावामागील रंजक कहाणी...
अल्प उत्पन्न गट एलआयजी -LIG
पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख
तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख /46.4 लाख
मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख
खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट - 40.3 लाख
वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख
खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख