
शुभम बायस्कर
CJI Bhushan Gavai Mother RSS Letter Controversy News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींच्या उपस्थितीवरुन अमरावतीत नवा वाद पेटला आहे. सुरुवातीला भूषण गवई (Chief Justice Of India) यांच्या आई डॉ. कमलताई गवई या आएसएसच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असं सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर कमलताई गवई यांनी पत्र लिहित या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले. अशातच या पत्रानंतर कमलताई गवई या संपर्कात नसल्याचे समोर आले आहे.
अमरावतीत आरएसएसच्या (RSS) निमंत्रण पत्रिकेवरून वाद निर्माण होत असतानाच डॉ. कमलताई गवई (Dr. Kamaltai Gavai) या संपर्क क्षेत्रात नसल्याचे समोर आले आहे. तसेच डॉ.कमलताई गवई यांच्या नावे वायरल होतं असलेलं ते पत्र खोटं असल्याची माहिती पुढे येत आहे. डॉ.कमलताई गवई कुठे आहेत या संदर्भातील माहिती खुद्द पुत्र राजेंद्र गवई यांनाही नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सस्पेन्स चांगलाच वाढला आहे.
काय म्हणाले राजेंद्र गवई?
पाच तारखेला संघाचा कार्यक्रम अमरावतीला होत आहे त्याचं निमंत्रण आईसाहेबांना भेटलेल आहे त्यांनी ते निमंत्रण स्वीकारल आहे. संघाच्या मुख्य कार्यक्रमांमध्ये यापूर्वी नागपूरमध्ये आदरणीय दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ खोब्रागडे आणि दिवंगत दादासाहेब गवई हे देखील गेले होते. गवई परिवाराचे पक्षविरहित संबंध आहे. इंदिरा गांधींसोबत दादासाहेब गवईंचे अतिशय जवळचे संबंध होते. विदर्भातील नेते गंगाधर फडणवीस यांच्यासोबत देखील दादासाहेबांचे संबंध होते. कार्यक्रमाला गेल म्हणजे विचारधारा बदलेल असं मुळीच नाही, असंही राजेंद्र गवई यांनी सांगितले आहे.
त्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे. आमची मैत्री राहील परंतु आमची विचारधारा ही पक्की आहे. गवई साहेबांच्या विरोधकांच्या पोटात दुखत आहे..त्यामुळे उलट्या सुलट्या सोशल मीडियावर टीका केल्या जातात. भूषणजी गवई मोठ्या पदावर गेल्यामुळे मुद्दामून विरोधक पद्धतीने टीका टिपणी करत आहे. मी आईसाहेबांनी सांगेल आईसाहेबांनी निर्णय घेतलेला आहे मी त्यांना एक सांगेल एक मुलगा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही सरन्यायाधीश भूषण गवई यांचे बंधु राजेंद्र गवई म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world