CM Devendra Fadnavis: महाराष्ट्र 'रेल्वे फाटकमुक्त' होणार, 145 उड्डाणपूल आणि..; फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन

रेल्वे फाटक अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
CM Devendra Fadnavis Nagpur Speech

Devendra Fadnavis Today News :  राज्यातील नागरिकांना सुरक्षित कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित दळणवळण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अशातच रेल्वे फाटक अभावी होणारे अपघात टाळण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामांना प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.वर्धमाननगर येथे रेल्वे क्रॉसिंगवर चार पदरी रोड,ओव्हर ब्रिज तसेच राज्यातील 484 कोटी रुपयांच्या 9 महत्वपूर्ण पायाभूत सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉपोरेशन लिमिटेड (महारेल)यांनी विकसीत केलेल्या या प्रकल्पाचे लोकार्पण समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी होते.यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल,आमदार कृष्णा खोपडे,चरणसिंग ठाकूर,महापौर निता ठाकरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी,महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल,दयाशंकर तिवारी, महानगरपालिकेचे नगरसेवक,लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

नक्की वाचा >> Pandharpur News: आषाढीसाठी पंढरपुरात 5500 बसेस आणि 11 हजार कर्मचारी, सरकारने मात्र वारकऱ्यांपुढे ठेवली एक अट

"संपूर्ण काम येत्या तीन वर्षात महारेलतर्फे पूर्ण होणार"

रेल्वे फाटकअभावी दरवर्षी 21 हजार लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्यात 524 रेल्वे फाटकांची आवश्यकता आहे. त्यापैकी 10 हजार पेक्षा जास्त दळणवळणातंर्गत असलेल्या फाटकासोबतच इतरही 145 रेल्वेवरील पुलाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे.हे संपूर्ण काम येत्या तीन वर्षात महारेलतर्फे पूर्ण करण्यात येणार आहे.रेल्वे प्रकल्पासंदर्भातील बांधकामासाठी महारेलची स्थापना केल्यामूळे पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळाली आहे. 

द्योगिक विकासाला चालना मिळाली

नागपूरसह मुंबईतील अतिशय कठीण पुलांच्या बांधकामांचे नियोजनबद्व काम जलद गतीने पूर्ण करण्यात आले आहे. महारेल्वेने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब केला असून यासाठी पेटेंटसुध्दा मिळविले आहे. कामाची गती व कमी खर्चात कामाचा दर्जा राखत पायाभूत सुविधांची कामे पूर्ण केल्याचा गौरव फडणवीस यांनी केला. नागपूर शहराच्या तसेच रस्त्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरु असल्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे.

नक्की वाचा >> Nashik News: नाशिकच्या 'या' परिसरात MNGL ची गॅस पाईपलाईन फुटली, गॅस गळतीमुळे नागरिक भयभीत

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या असून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे.त्यामुळे सामाजिक व आर्थिक विकास होत असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.भगवान संभनाथ चौक ते डिप्टी सिग्नल मार्ग या रेल्वे ओव्हर ब्रिजला माजी महापौर बाहरीनबाई सोनबोईर यांचे नाव देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.