Video : 'तो' फक्त शिवाजी महाराजांचा मान! संतांसमोर CM फडणवीसांच्या कृतीनं जिंकली सर्वांची मनं

CM Devendra Fadnavis Video : शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वारशाचा आदर केला पाहिजे, त्याला वंदन केलं पाहिजे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखून दिलं आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins
आळंदी, पुणे:

CM Devendra Fadnavis Video : छत्रपती शिवाजी महाराज हा संपूर्ण देशाचे आराध्यदैवत आहेत. शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमानं आणि राज्यकारभारानं देशाचा इतिहास बदलला. हजारो वर्षांच्या भारत देशाच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं स्थान आहे. त्यामुळेच आजही 'जाणता राजा'  म्हंटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर येते. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वारशाचा आदर केला पाहिजे, त्याला वंदन केलं पाहिजे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखून दिलं आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय घडलं?

आळंदीमधील संत कृतज्ञता सन्मान कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांचा जिरेटोप फडणवीसांसाठी आणण्यात आला होता. पण, मुख्यमंत्र्यांनी नम्रपणे जिरेटोप घालण्यास नकार दिला. 

स्वामी गोविंददेव गिरी महाराज, बाबा महाराज, भास्करगिरी महाराज यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्ती यावेळी स्टेजवर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते फडणवीसांचा सत्कार झाला. पण, फडणवीसांनी जिरोटोप घालण्यास नकार दिला. त्यांनी महाराजांच्या जिरेटोपाला वंदन केलं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कृतीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट नातं असलेला जिरेटोप घालण्यास नकार देत फडणवीस यांनी तो मान फक्त महाराजांचा असल्याचं कृतीतून दाखवून दिलं आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : कलंक ते टरबूजा म्हणून हिणवले, तेच विरोधक फडणवीसांच्या प्रेमात का पडले? )

यापूर्वी झाला होता वाद

दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 15 मे 2024 रोजी राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा जिरोटोप घातला होता. त्यामुळे वाद झाला होता. विरोधी पक्षासह शिवप्रेमींनीही या कृतीवर टीका केली होती. त्यानंतर पटेल यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं.

'हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या आदर्शांवर व लोककल्याणाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान होईल, अशी कोणतीही गोष्ट कधी मनातही येऊ शकत नाही. यापुढे काळजी घेऊ,' असं स्पष्टीकरण पटेल यांनी दिलं होतं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी जिरेटोप घालण्यास नकार देत कोणताही नवा वाद होणार नाही, याची काळजी घेतली आहे. 

पाहा Video

Topics mentioned in this article