Palghar News : आदिवासी मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटणारे माजी खासदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचं निधन

लहानू कोम हे लाखो आदिवासी मुलामुलींना गेली सहा दशके शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे 1962 पासून आजवर अध्यक्ष होते. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 1959 पासूनचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते, पक्षाचे माजी राज्य सचिवमंडळ सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, माजी खासदार, माजी आमदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम (ल. शी. कोम) यांचे काल 28 मे रोजी पालघरमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. लहानू कोम हे लाखो आदिवासी मुलामुलींना गेली सहा दशके शिक्षण देणाऱ्या आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेचे 1962 पासून आजवर अध्यक्ष होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मृत्युसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. गेले 10 दिवस कॉम्रेड लहानू कोम एका खासगी रुग्णालयात आय.सी.यू.मध्ये होते.  त्यांच्यामागे पत्नी हेमलता, पुत्र सुबोध, सून सुजाता, नातू तुषार, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात, नातू विजय आणि नात रुचिता असा परिवार आहे. कॉम्रेड ल. शी. कोम  यांनी 1977 ते 1980 पर्यंत तत्कालीन डहाणू लोकसभेचे संसद सदस्य म्हणून निवडून येत नेतृत्व केले.

Advertisement

नक्की वाचा - Gadchiroli News : गडचिरोलीत मोठी कारवाई, माओवाद्यांचा घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला, न5 जण ताब्यात

या काळात त्यांची केंद्र सरकारमध्ये अनुसूचित जाती, जमातीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. या काळात त्यांना भारतभर सामाजिक कार्य करण्याची संधी मिळाली. त्यानंतर 1981 ते 1985 पर्यंत जव्हार तलासरी विधानसभा मतदार संघांचे आमदार म्हणून निवडून येऊन सामान्य नागरिकांसाठी मोठे कार्य केले.

Topics mentioned in this article