विधानसभा निवडणुकीत बड्या नेत्यांचा प्रचाराचा धुरळा, काँग्रेस अन् भाजपकडून कोण उतरणार मैदानात?

काँग्रेसकडूनही 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही राज्यभरात सभा होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. प्रचाराला सुरुवात झाली असून दोन्ही आघाडीने प्रचाराचा आलेख तयार केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे बडे नेते प्रचार सभा घेणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नावं आहेत. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक 50 सभा घेणार आहेत. तर नितीन गडकरी पुढील 18 नोव्हेंबरपर्यंत 40 सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही राज्यभरात सभा होणार आहेत. गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री ही महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची माहिती आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून 100हून अधिक सभांचे नियोजन तयार करण्यात आले असून पंतप्रधान मोदींच्या पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात एकूण 8 सभांचे नियोजन करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी व चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अधिक सभांची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ही 15 सभा होणार आहेत. गोवा, मध्य प्रदेश, हरियाणातील मुख्यमंत्री ही महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. 

नक्की वाचा - मुंबईचे सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? पाच वर्षात दणदणीत वाढ, आकडा पाहून डोळे विस्फारतील!

पंतप्रधान नरेंद्र मोदी - 8
अमित शाह - 20
नितीन गडकरी - 40
देवेंद्र फडणवीस - 50
चंद्रशेखर बावनकुळे - 40
योगी आदित्यनाथ - 15

Advertisement

काँग्रेसकडूनही 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांच्या स्टार प्रचारकांची नावं यादीत आहे. महाराष्ट्रातून नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह मोठ्या नेत्यांची नावं आहेत. कन्हैया कुमार, जिग्नेश मेवानीदेखील प्रचारसभेसाठी महाराष्ट्रात येणार आहेत. विशेष म्हणजे या यादीत दक्षिणेकडील बड्या काँग्रेस नेत्यांच्या नावाचाही समावेश आहे.