विधानसभेसाठी अर्ज (Assembly Election 2024) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन आघाड्या आणि सहा पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान 2019 च्या तुलनेत उमेदवाऱ्यांच्या संपत्तीतही मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. (Parag Shah richest candidate in Mumbai Legislative Assembly)
मुंबई विधानसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या संपत्तीही मोठी वाढ झाली आहे. 2019 मध्ये 700 कोटींची संपत्ती असलेल्या या उमेदवारांची आताची संपत्ती तब्बल साडे तीन हजार कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आमदारांना अच्छे दिन आल्याचं दिसत आहे.
नक्की वाचा - Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेत दोन आघाड्या, सहा पक्ष अन् बंडखोरीला उधाण
घाटकोपर पूर्व मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराग शहा हे मुंबई विधानसभा निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये त्यांच्या नावे 700 कोटींची संपत्ती होती. 2024 मध्ये त्यात जवळपास पाच पटीने वाढ झाली असून हा आकडा साडे तीन हजार कोटींपर्यंत पोहोचली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत पराग शहा यांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर झाली, त्यानंतर ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. यंदा प्रकाश मेहता यांना डावलून सलग दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world