'मोदीजी घाबरु नका, तुमच्यात हिंमत असेल तर...', प्रियांका गांधींचे जाहीर सभेतून आव्हान

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गडचिरोलीमधील वडसा येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

जाहिरात
Read Time: 2 mins

गडचिरोली: महाराष्ट्र समानता, एकजुटता मानणारा धार्मिक कट्टरतेला विरोध करणारा प्रदेश आहे. या भूमीत कधी भेदभाव झाला नाही. इथे येणाऱ्या सरकारनेही कधी प्रदेशाच्या विकासात तुलना, भेदभाव केला नाही. परंतु आज महाराष्ट्रासोबत भेदभाव होत आहे. असे म्हणत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गडचिरोलीमधील वडसा येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या. 

काय म्हणाल्या प्रियांका गांधी? 

महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बिरसा मुंडा, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान व्यक्तींची धरती आहे. आज आपला देश मजबूत संविधान याचा पाया याच महान लोकांमुळे भरला गेला. महाराष्ट्र नेहमी देशासाठी मार्गदर्शक म्हणून राहिला आहे.  मी जेव्हा माझे भाषण करत होते तेव्हा विचार करत होते की इतके महापुरुष, कर्तबगार महिला या महाराष्ट्रातील आहेत, त्यांची संख्या सांगणे कठीण आहे. 

महाराष्ट्र समानता, एकजुटता मानणारा धार्मिक कट्टरतेला विरोध करणारा प्रदेश आहे. या भूमीत कधी भेदभाव झाला नाही. इथे येणाऱ्या सरकारनेही कधी प्रदेशाच्या विकासात तुलना, भेदभाव केला नाही. परंतु आज महाराष्ट्रासोबत भेदभाव होत आहे. इथे येणारे उद्योग बाहेर जात आहेत. इथून अनेक मोठमोठ्या कंपन्या गुजरातला गेल्या. जवळपास ८ लाखांचा रोजगार बाहेर गेला.६००० पेक्षा जास्त कंपन्या बंद झाल्यात. ही महाराष्ट्राची आजची स्थिती आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच माझे मोदीजींना आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर मंचावर उभे राहून एकदा जातीय जनगणना करणार असे सांगा. घाबरु नका.. असे थेट आव्हानही त्यांनी दिले. 

भाजपवर टीका

भाजपचे मोठमोठे नेते येतात, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. मोठ्यामोठ्या गोष्टी करतात पण छत्रपतींचा अपमानही होत आहे. संसदेच्या बाहेर असणारा पुतळाही हटवला गेला. सिंधुदुर्गमधील पुतळ्यात इतका भ्रष्टाचार झाला की तो शेवटी कोसळला. मंचावर मात्र त्यांचे नाव घेतात पण मनातून आदर नाही.. भाजपचे लोक विचार करतात की, स्टेजवर काहीही बोलायचे पण प्रत्यक्षात काम करायचे नाही. जतनेसाठी कोणतीही जबाबदारी नाही. राजकारणाची दिशा बदलून जाते तेव्हा तुमच्या प्रश्नांवर, संघर्षावर कोणी बोलत नाही. चर्चा फक्त तुमचे लक्ष भरकटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतात, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली. 

Advertisement