प्रविण मुधोळकर नागपूर: जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर अवघा देश शोकसागरात बुडाला असतानाच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन सत्ताधाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करताना धर्म विचारला नाही, एवढा वेळ असतो का? असं ते म्हणाले होते. वडेट्टीवार यांच्या या विधानावरुन मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितली आहे. तसेच माझे वक्तव्य मोडून तोडून दाखवल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
"मी काल बोललो की अतिरेक्यांना पहिल्यांदा एवढा वेळ मिळाला का की त्यांनी धर्म विचारून गोळीबार केला. माझे तेवढेच वक्तव्य दाखविण्यात आले माझी चॅनलला विनंती आहे माझं पूर्ण वक्तव्य दाखवा. अतिरेक्यांना पाकिस्तानने शिकवून पाठवलं देशात यादवी व्हावी म्हणून धर्म विचारून मारण्यात आले.देशाच्या सर्वभौमतेला, अखंडतेला खिंडार पाडण्यात त्यांना यश मिळवायचं होतं त्यामुळे त्यांनी असा कट रचला. 26 वर्षानंतर पर्यटकांवर झालेला हल्ला आहे, हे अपयश लपविण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवले..", असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
"ज्या निष्पाप लोकांचा बळी गेला त्यांच्या कुटुंबियांना माझ्या बोलण्याने भावना दुखावल्या असतील कुटुंबांना वेदना झाला असेल तर मी माफी मागतो. मीडियाला माझी विनंती आहे माझं भाषण पूर्ण दाखवा अर्धवट भाषण दाखवून सरकारचा अपयश लपवू नका. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये, माझी भूमिका स्पष्ट आहे. अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारतात अतिरेक्यांना इतका वेळ मिळाला. दोन धर्मात भांडण लावलं जात हे पहिल्यांदा केलं जात आहे.." असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, "नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद त्यांच्या पक्षाचा अंतर्गत आहे तरी महायुतीत सगळं आलबेल आहे असे मी म्हणणार नाही. अमित शहा येऊन गेले पण तोडगा निघाला नाही. तीन तिघाडा काम बिघाडा सुरू आहे. परस्पराविरोधात वक्तव्य केली जात आहेत सरकार म्हणून महाराष्ट्रात एकत्रित काम करताना दिसत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांना जनतेशी काही देणंघेणं नाही. ते सत्ता खुर्चीसाठी भांडण आहेत.." अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
Palghar News: 100 किमीची धावपळ, तरीही नवजात बालकाचा जीव गेला, आरोग्य व्यवस्थेविरोधात संताप