Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: 'आम्ही सोबत आहोत', विजय वडेट्टीवारांच्या ट्विटने काँग्रेसची भूमिका स्पष्ट? 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मराठी विजयाच्या जल्लोष मेळाव्यापासून काँग्रेस आतापर्यंत तरी दूर राहिली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava) यांच्या मराठी विजयाच्या जल्लोष मेळाव्यापासून काँग्रेस आतापर्यंत तरी दूर राहिली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या एका मोठ्या वर्गाने शनिवारच्या मेळाव्यात सामील होण्याचा विरोध केला आहे. काँग्रेसकडून हिंदी सक्तीला विरोध आहे, मात्र ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी गैर-मराठी मतांना धक्का पोहोचवू इच्छित नाही असं दिसतंय. 

दरम्यान आज विजयी वडेट्टीवार यांनी केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी आम्ही सोबत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काँग्रेसची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याची चर्चा केली जात आहे. 

विजय वडेट्टीवारांचं ट्विट... (vijay wadettiwar tweet on Marathi)

मराठी आपली मातृभाषा,
आपली राजभाषा 
आपली ओळख...

ही ओळख जपण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी जो आवाज उठतो आहे, त्या प्रत्येक आवाजासोबत आम्ही आहोत. हिंदी सक्तीविरोधात सरकारने जीआर मागे घेतला असला तरी समिती नेमली त्यामुळे हा लढा थांबलेला नाही. मराठीला धक्का लावणाऱ्या प्रत्येक षडयंत्राविरोधात अधिक निकराने लढा द्यावा लागेल!

Advertisement

नक्की वाचा - Raj Thackeray Uddhav Thackeray Live : Live Update : हर्षवर्धन सपकाळ विजयी सभेकडे पाठ फिरवणार? पक्ष नेतृत्वाकडून सभेपासून दूर राहण्याचा आदेश

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा आज वरळी येथील डोम येथे साजरा होत आहे. मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेले राज आणि उद्धव राजकारणातही एकत्र दिसणार का?  आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मनसे आणि ठाकरे एकत्र लढणार का? असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे बदल घडू शकतात.

Advertisement