शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा होणार आहे. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा उद्या वरळी डोममध्ये पार पडणार आहे. सध्या या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. 8 हजार क्षमतेचा हा डोम (Worli Dome) सजवला जात असून, व्हीआयपी रांगांचीही आखणी केली जात आहे. आज ठाकरे बंधू काय बोलणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. दरम्यान आज नेमकी भाषणं होणार असल्याची माहिती आहे. यावेळी प्रकाश रेड्डी, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, राज ठाकरे, आणि उद्धव ठाकरे यांचीच भाषणं होणार आहे.
Live Update : अखेर तो क्षण आला, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र...
अखेर तो क्षण आला, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र...
Live Update : राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बैठक
राज ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे...
Live Update : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित बैठक...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित बैठक...
Live Update : ठाकरेंचा जल्लोष मेळावा पाहा Live
Live Update : महाराष्ट्र माझा गीताने कार्यक्रमाला सुरुवात...
महाराष्ट्र माझा गीताने कार्यक्रमाला सुरुवात...
Live Update : रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे सभास्थळी दाखल...
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपूत्र तेजस ठाकरे देखील सभास्थळी दाखल...
Live Update : रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे सभास्थळी दाखल...
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, सुपूत्र तेजस ठाकरे देखील सभास्थळी दाखल...
Live Update : भगव्या शालीत असणारे राज ठाकरे आज निळ्या शालीत...
राज ठाकरेंनी निळ्या रंगाची शाल परिधान केली आहे. ऐरवी भगव्या शालीत असणारे राज ठाकरे आज निळ्या शालीत दिसत आहेत...
Live Update : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल...
Live Update : सुप्रिया सुळे डोम परिसरात दाखल...
घरापासून डोमजवळ यायला दहा मिनिटं लागतात आता एक तास लागला. ठाकरे विजयी मेळाव्यात अभूतपूर्व गर्दी - सुप्रिया सुळे
Live Update : सुप्रिया सुळे वरळी डोममधील सभास्थळी दाखल...
सुप्रिया सुळे वरळी डोममधील सभास्थळी दाखल...
Live Update : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना..
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना..
Live Update : गुंतवणूकदार सुशील केडियाचे वरळीतील कार्यालय फोडले, मनसे कार्यकर्त्यांचा संताप
Live Update : गुंतवणूकदार सुशील केडियाचे वरळीतील कार्यालय फोडले, मनसे कार्यकर्त्यांचा संताप
Raj Thackeray Uddhav Thackeray Live: वरळी डोमबाहेर अभूतपूर्व गर्दी, राज्यभरातून मराठी एकवटले
वरळी डोमबाहेर मराठी प्रेमींची तोबा गर्दी
डोममधील आसन व्यवस्था फूल असल्याने कुणालाही आत सोडलं जात नाही
Live Update : संजय राऊत यांचे वरळीतील डोम येथील मेळाव्यास्थळी आगमन...
संजय राऊत यांचे मेळाव्यास्थळी आगमन...
Live Update : 'आम्ही सोबत आहोत', विजय वडेट्टीवारांच्या ट्विटने काँग्रेसची भूमिका स्पष्ट?
मराठी आपली मातृभाषा,
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) July 5, 2025
आपली राजभाषा
आपली ओळख...
ही ओळख जपण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी जो आवाज उठतो आहे, त्या प्रत्येक आवाजासोबत आम्ही आहोत.
हिंदी सक्तीविरोधात सरकारने जीआर मागे घेतला असला तरी समिती नेमली त्यामुळे हा लढा थांबलेला नाही.
मराठीला धक्का लावणाऱ्या प्रत्येक…
Live Update : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच ताफ्यातून मेळाव्यात सामील होणार
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच ताफ्यातून मेळाव्यात सामील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
Live Update : अभिनेता भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव मेळाव्यास्थळी दाखल..
अभिनेता भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव मेळाव्यास्थळी दाखल..
Live Update : हर्षवर्धन सपकाळ विजयी सभेकडे पाठ फिरवणार? पक्ष नेतृत्वाकडून सभेपासून दूर राहण्याचा आदेश
हर्षवर्धन सपकाळ विजयी सभेकडे पाठ फिरवणार? पक्ष नेतृत्वाने विजयी सभेपासून अंतर राखण्याचा आदेश दिल्याची माहिती. विजय सभा महा विकास आघाडीच्या फुटीची सुरुवात ठरण्याची तज्ञांनी वर्तवली शक्यता
Live Update : शिवसेना मनसेचा जल्लोष मेळाव्याची प्रत्येक अपडेट पाहा Live
Live Update : 'वाजत गाजत या' मनसेतून ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांच कार्यकर्त्यांना आवाहन
'वाजत गाजत या' मनसेतून ठाकरे गटात आलेल्या वसंत मोरे यांच कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबईच्या मेळाव्याला रवाना होताना राज्यभरातील कार्यकर्त्यांना वसंत मोरे यांनी घातली भावनिक साद
मराठी माणसांच्या मनातील आजचा आनंदाचा दिवस
वीस वर्षाच्या कालावधीनंतर दोन्ही बंधू एकत्रित येत आहेत ही सगळ्यांसाठी आनंदाची बाब
मी दोन्ही पक्षात काम केलं पण या दोन्ही नेत्यांना एकाच मंचावर मी कधीच पाहिलं नाही माझ्यासाठी हा क्षण वेगळा असेल
Live Update : पुण्यातून मनसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्रित मुंबईकडे रवाना
पुण्यातून मनसैनिक आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्रित मुंबईकडे रवाना
आजचा मेळावा नव्या युतीची नांदी म्हणत पुण्यातून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित मुंबईकडे रवाना
मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मुंबईकडे एकत्रित प्रवास
पुण्यातील बालेवाडी स्टेडियम समोरून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
आमच्यासाठी हा आजचा आनंदाचा दिवस
भविष्यात मोठे काहीतरी आम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवसाचा आनंद वेगळा
पुण्यातील सर्व स्थानिक नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास
Live Update : अंधेरी विधानसभेमध्ये ठाकरे मनसे कार्यकर्ते विजय मेळाव्यासाठी रवाना
हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र येत असून, मराठी माणसांच्या एकजुटीसाठी वरळीतील विजयी मेळाव्यातून ठाकरे बंधू हाक देणार आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी मेळाव्यासाठी रवाना होत आहेत , कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता मराठी अस्मितेसाठीचा निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ऐतिहासिक ठरणार आहे.
Live Update : ठाण्यात शिवसैनिक व मनसैनिक जमायला सुरुवात..
ठाण्यात शिवसैनिक व मनसैनिक जमायला सुरुवात..
ठाणे शहराच्या वेशीवर राज उद्धव यांचा विजय असो मराठी भाषेचा विजय असो कार्यकर्त्यांकडून लगावण्यात येत आहेत घोषणा..
Live Update : मुंबईच्या दादर परिसरात पुन्हा एकदा लागले ठाकरे यांना डिवचणारे बॅनर
मुंबईच्या दादर परिसरात पुन्हा एकदा लागले ठाकरे यांना डिवचणारे बॅनर
बॅनरवर "जलेबी ना फाफडा ऊद्धव ठाकरे आपडा" असा बॅनरवर ऊल्लेख
आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असताना तसेच आमच्याकडून गुजराती व्यापाऱ्यांना झालेली मारहाण आणि काल एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्र सोबत जय गुजरात म्हटल्यानंतर ठाकरेंवर अनेक आरोप केलेयत, मनपा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातींना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचा केलाय आरोप
मातोश्री आणि दादर परिसरात सध्या निनावी बॅनर्सची जोरदार चर्चा
Live Update : मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा; मुंबईत बॅनरबाजी
हिंदी सक्तीचा महायुती सरकारने जीआर रद्द केल्यानंतर ठाकरे बंधू आणि मराठी माणसे आज एकत्र येत विजय मेळावा मुंबईत घेणार आहे
या विजय मेळावा मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेसच्या वतीने देखील पाठिंबा दर्शविण्यात आल्याचे बॅनर वर दिसून येत आहे..
मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा
ठाकरेंबाबतचे बॅनर मुलुंड टोलनाक्यावर झळकत आहेत
दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, आनंद दिघे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार पार्टी कडून शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन पाटील
आदित्य आणि अमित ठाकरे यांचेही बॅनरवर फोटो....
Live Update : पुण्यातून मनसैनिक मुंबईकडे विजयी मेळाव्यासाठी रवाना
पुण्यातून मनसैनिक मुंबईकडे रवाना
मुंबईत होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला मनसैनिक पुण्यातून मोठ्या संख्येने रवाना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी एकत्रित मुंबईकडे
Live Update : मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागले
मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागलेत. विशेष म्हणजे या बॅनरवरील फोटो हा बाळासाहेब ठाकरे यांनी राज-उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि वरूण सरदेसाई यांनी हा बॅनर लावला आहे.
Live Update : मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागले
मातोश्री येथे ठाकरे बंधूचे बॅनर्स लागलेत. विशेष म्हणजे या बॅनरवरील फोटो हा बाळासाहेब ठाकरे यांनी राज-उद्धव यांच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे आणि वरूण सरदेसाई यांनी हा बॅनर लावला आहे.
Live Update : नाशिकमध्ये मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी उभारली विजयाची गुढी
मुंबईत विजयी मेळाव्याला निघण्यापूर्वी नाशिकमध्ये मनसेच्या राजगड कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यानी उभारली विजयाची गुढी.. शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते एकच ब्रँड ठाकरे ब्रँडची घोषणाबाजी करत मुंबईकडे रवाना..