जाहिरात

'शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो, भाजप त्यांच्या पिलावळी...', टिपू सुलतान वादावर हर्षवर्धन सपकाळांचं ट्वीट

'मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत.'

'शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो, भाजप त्यांच्या पिलावळी...', टिपू सुलतान वादावर हर्षवर्धन सपकाळांचं ट्वीट

Harshvardhan Sapkal on Tipu Sultan controversy : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर खळबळ उडाली आहे. राज्यभरातून भाजपकडून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं असून दिलगिरी व्यक्त केली आहे. याशिवाय ट्विटमध्ये सपकाळ यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. 

हर्षवर्धन सपकाळ यांचं ट्विट...

सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे.

मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही,मी केलेली नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये, जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये, हीच भूमिका मी मांडली होती. 

नक्की वाचा - Ahilyanagar News: हर्षवर्धन सपकाळांची जीभ कापणाऱ्याला 10 लाखांचे बक्षिस, भाजपच्या नेत्याने केली घोषणा

प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.

शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे,  आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू! 

कठीण वज्रास भेदूं ऐसे
भले तरि देऊं कासेची लंगोटी ।
 नाठाळाचे माथी हाणू काठी ।
मायबापाहूनि बहु मायावंत । 
करूं घातपात शत्रूहूनि ॥
अमृत तें काय गोड आम्हांपुढें ।
 विष तें बापुडें कडू किती ॥

Listen to the latest songs, only on JioSaavn.com