राकेश गुडेवर, रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीवरच्या नवीन पुलाला तडे गेल्याने येथील वाहतूक थांबवण्यात आली आहे. पुलावरील जॉईंट काही प्रमाणात खचला आहे. वाहने पुलावरुन गेल्यानंतर तो भाग पूर्णपणे हालत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून देखील इथली पाहणी करण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत वाहनचालक येथून प्रवास करावा लागत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी पुलावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या पुलावर वळवण्यात आली आहे. त्यामुळेदोन्ही मार्गावरील वाहतूक एकाच पुलावरुन केली जात आहे. पुलाला तडे गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुलाच्या बांधकामाबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी देखील केली जात आहे.
(Vidarbha Rain : भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपुरातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर)
अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
जगबुडी नदीने देखील धोका पातळी ओलांडली. शास्त्री, काजळी, मुचकुंदी आणि कोदवली या नद्यांनी देखील धोका पातळी ओलांडल्याने परिस्थित चिंताजनक बनली आहे. नदी काठाजवळच्या अनेक भात शेतामध्ये शिरलं पाणी आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
(नक्की वाचा: खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांनाच हाती घ्यावे लागले फावडे-घमेले)
रत्नागिरीसह कोकणात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक देखील काही तास ठप्प झाली होती. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने अंजणारी पुलावरील वाहतूक थांबवण्यात आली होती.