'दिगंबरा दिगंबरा' च्या गजरात नृसिंहवाडी दुमदुमली, दत्त जयंतीदिनी लाखो भाविकांची उपस्थिती

Datta Jayanti 2024 : श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, कोल्हापूर

नृसिंहवाडीतील कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. 'दिगंबरा दिगंबरा'च्या अखंड गजर व श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषात नृसिंहवाडी दुमदूमली आहे. बस स्थानकापासून मुख्य दत्त मंदिर महामार्गावर भाविकांची प्रचंड गर्दी आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कृष्णा नदीत स्नान करून भाविक दत्त दर्शन घेत आहेत. दत्त देवस्थानच्या वतीने मंदिराच्या उत्तर बाजूस तीन ठिकाणी दर्शनरांगेचे नियोजन केल्याने भाविकांना दत्त प्रभूंचे दर्शन सोपं झाले आहे. दत्त जयंतीनिमित्त मंदिरात गेली 7 दिवस अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत. 

आज मंदिरात पहाटे साडेतीन वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी 7 ते 12 यावेळेत अनेक भक्तांनी ‘श्री ना' पंचामृत अभिषेक पूजा होणार आहे. तर सायंकाळी 5 वाजता श्रींचा जन्मकाळ सोहळा होणार आहे. 

(नक्की वाचा- राज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपाचा सल्ला शिंदेंनी मानला ! 'त्या' 4 जणांना वगळणार, पाहा संभाव्य यादी)

श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यासाठी महाराष्ट्रसह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी अनेक राज्यातून लाखो भाविक येत असतात. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. 

Advertisement

दत्त देव संस्थानचे विश्वस्त,ग्रामपंचायतचे सदस्य,शासकीय अधिकारी, वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान,एस के पाटील व दत्त महाविद्यालय कुरुंदवाड व श्री दत्त विद्या मंदिर हायस्कूलचे विधार्थी स्वयंसेवकांनी तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अधिक परिश्रम घेऊन उत्सवाचे नेटके नियोजन केले आहे. तरी भाविकांनी शांततेत दत्त प्रभूंचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री नृसिंह सरस्वती देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Topics mentioned in this article