Cyclone Montha live updates: मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरुन पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांच्या आत २८ ऑक्टोबरच्या रात्री आंध्रप्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडाजवळ धडकण्याचा अंदाज आहे. सोमवारी रात्री जारी केलेल्या हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ मोंथा गेल्या सहा सहा तासात साधारण १३ किलोमीटर प्रतितासाच्या गतीने उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जात आहे. २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.
'मोंथा'मुळे विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भात २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी याबाबत घोषणा केली. चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूरमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाकडून या भागात 'यल्लो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नक्की वाचा - Thane Air Pollution: ठाणेकरांच्या प्रकृतीला धोका! हवेचे प्रदूषण वाढले; AQI किती?
वैज्ञानिक प्रवीण कुमार (प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर) यांनी सांगितले की, 'मोंथा' चक्रीवादळ पश्चिम-मध्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि लगतच्या भागातून उत्तर-वायव्येकडे सरकले आहे, ज्यामुळे या प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
५ राज्यांमध्ये 22 एनडीआरएफची पथके तैनात
आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतर... मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. वाढता धोका पाहता सरकारने पाचही बाधित राज्यांमध्ये 22 एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफचे डीआयजी मोहसीन शाहिदी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, आतापर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि छत्तीसगडमधील सर्व बाधित भागात एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
