सुनील दवंगे, अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई गावात एक धक्कादायक मारहाणीची घटना घडली आहे. जुन्या वादाच्या रागातून नितीन संजय वैरागर या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
नक्की वाचा: "4 वेळा बलात्कार केला..." पोलीस अधिकाऱ्यावर आरोप करत डॉक्टर तरुणीची आत्महत्या
जातीय वैमनस्यातून मारहाणीचा आरोप
कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानुसार, जातीय वैमनस्यातून ही मारहाण करण्यात आली. आरोपींनी नितीन वैरागर याला जबरदस्तीने गाडीत बसवून अज्ञात ठिकाणी नेले आणि तिथे लाकडी दांड्याने, लाथाबुक्यांनी निर्दयपणे मारहाण केली. मारहाणीदरम्यान जातीयवाचक शिवीगाळही करण्यात आल्याचा आरोप आहे.
11 जणांविरोधात गुन्हा दाखल
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या नितीन वैरागर याच्यावर सध्या अहिल्यानगर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात संभाजी लांडे, संदीप लांडे, राजू मोहिते, गणेश चव्हाण, विशाल वने, महेश दरंदले, शुभम मोरे, अक्षय शेटे, नितीन शिंदे, स्वप्निल भळगट, हासणे आदींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Pune News: 'पुणेकर विरुद्ध बाहेरचे' आमने-सामने! "चालले, परत येऊ नका" पोस्टरला तरुणाचं सडेतोड उत्तर)
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील आरएसएसच्या पंधरा ते वीस गुंडानी गावातून उचलून नेऊन अज्ञात स्थळी अमानुषपने मारहाण केली. अत्यंत क्रूरपने पायावरून, हातांवरून मोटार सायकल घालून हात-पाय मोडले. त्याला जबर मारहाण करून डोळा निकामी केला आणि… pic.twitter.com/Tr2CYqsnq6
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 23, 2025
आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा- प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत ट्वीट करत म्हटलं की, अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारी ही घटना आहे. या पीडित तरुणाला अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world