DCM Ajit Pawar Beed Visit: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आज ते पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर येत आहेत. अजित दादांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक पार पडणार आहे. बैठकीला मंत्री पंकजा मुंडे, भाजपा आमदार सुरेश धस आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. बीडमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत बीडमधील नेते अधिकाऱ्यांचे कान टोचले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
'बीडच्या परिसरामध्ये सध्या वेगवेगळ्या बातम्या वाचत असतो, मात्र जिथे तथ्य असेल तिथे कारवाई होईल. माझी कामाची वेगळी आहे, मंजुर झालेल्या कामांमध्ये वेडेवाकडा प्रकार झाला तर मी सहन करणार नाही. मी बारामती, पुणे, सातारा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केले. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आपल्याला काम करायचे आहे. जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, विकासाची कामे करताना कोणी खंडणी मागण्याचा प्रकार करु नये. माझ्या कानावर आल्यास मी मकोका लावायलाही मागेपुढे पाहणार नाही,' असं अजित पवार म्हणाले.
तसेच 'जे अधिकारी जास्तदिवस एकाच जागी आहेत त्यांची बदली होणार. बंदूक लाऊन फिरणाऱ्यांची लायसन्स रद्द केले जाईल. बदल झाला पाहिजे आणि तो नागरिकांना जाणवला पाहिजे. - आपली प्रतिमा चांगली ठेवा, आजूबाजूला चांगले लोकसोबत ठेवा. राजकीय हस्तक्षेप घेऊ देणार नाही. चिरी मिरी वाटायला इये आलो नाही,' असे म्हणत निधी वाटपावरुनही अजित पवारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले.
ट्रेंडिंग बातमी - CMO news: मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे
निवडणुकीत सत्ता आल्यानंतर अनेक हौसे- गवसे मला भेटत आहेत. लोकसभेला एकीकडे आता विधानसभेला इकडे. दादा एवढी वेळ, पदरात घ्या, पांघरुन घाला असे प्रकार चालणार नाहीत. पांघरून घालून माझे पांघरून फाटून गेले आहे. आता माझ्याकडे पदरही शिल्लक नाही, गंभीर गुन्ह्यांवर मकोका लावला जाईल. बाहेरच्या उद्योजकांना त्रास झाल्यास गुन्हे दाखल केले जातील. बीड जिल्ह्याची सुरु असलेली बदनामी आपल्याला पुसायची आहे, असंही अजित पवार म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world