VIDEO: 37 वर्षांचा संसार.. दादांनी साथ सोडली, वहिनी गहिवरल्या, 'त्या' क्षणाने लाखोंचा समुदाय स्तब्ध झाला!

सुनेत्रा पवारांचा चेहराच सर्व काही सांगून जात होता. आयुष्यभराची दादांची साथ संपल्याची जाणीव त्यांच्या खोल डोळ्यात होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

DCM Ajit Pawar Passed Away:  महाराष्ट्राचे लाडके दादा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पवार कुटुंबियांसह अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बुधवारी अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर लाखोंचा जनसमुदाय बारामतीमध्ये गर्दी करत आहे. रात्रीपासून अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवले आहे. इथे जमलेल्या लाखोंच्या समुदायाला पत्नी सुनेत्रा पवार आणि जय पवारने हात जोडून शांततेचे आव्हान केले अन् सगळेच स्तब्ध झाले. 

सुनेत्रा पवारांनी हात जोडले, लाखोंचा जनसमुदाय स्तब्ध झाला..

लाखोंच्या जनसमुदायासमोर सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनी अश्रु आवरत हात जोडले. बारामतीमधला हा क्षण पाहून राज्यातल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा जय पवार यांनी हात जोडून दादांना अखेरचा निरोप दिला आणि वातावरण सुन्न झालं. सुनेत्रा पवारांचा चेहराच सर्व काही सांगून जात होता. आयुष्यभराची दादांची साथ संपल्याची जाणीव त्यांच्या खोल डोळ्यात होती.

Ajit Pawar: अजित पवार वाचले असते जर...,दादांचे 27 वर्ष सारथ्य करणारे श्यामराव असं का म्हणाले?

37 वर्षांचा संसार अर्ध्यावर मोडला

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची कोणतीही लव्ह स्टोरी नव्हती. तर 1985 मध्ये अॅरेंज मॅरेजने संसाराची मुहूर्तमेढ रोवली गेली. शरद पवार आणि पद्मसिंह पाटील यांच्या मैत्रीतून हे स्थळ आलं आणि 30 डिसेंबरला दोघेही लग्नबंधनात अडकले. त्यानंतर सुरू झाला तो प्रेमाचा, विश्वासाचा आणि अढळ साथीचा प्रवास. राजकारणात दादांवर कितीही टीका झाली, कितीही संकटे आली, तरी सुनेत्रा वहिनी त्यांच्या मागे हिमालयासारख्या उभ्या राहिल्या.  

Advertisement

आज या 37 वर्षांच्या प्रवासाला नियतीने अर्ध्यावरच खिळ लावली.  अजित पवारांचं अकाली जाणं हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. बारामतीत आप्तेष्ठांना मिठी मारून रडणाऱ्या सुनेत्रा पवार सुनेत्रा पवारांना पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला. 37 वर्षांच्या सुखी संसाराला आज नजर लागली अन् नियतीचा क्रूर घाला घातला. दादांच्या मृत्यूने दादा वहिनींची ही साथ अधुरीच राहिली. 

नक्की वाचा - Ajit Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार?, 'या' आहेत 5 शक्यता