जाहिरात

Ajit Pawar: अजित पवार वाचले असते जर...,दादांचे 27 वर्ष सारथ्य करणारे श्यामराव असं का म्हणाले?

आपल्याला त्यावेळी सु्न्न झाल्यासारखे झाले. काहीच कळत नव्हतं असं ही त्यांनी सांगितलं.

Ajit Pawar: अजित पवार वाचले असते जर...,दादांचे 27 वर्ष सारथ्य करणारे श्यामराव असं का म्हणाले?
  • अजित पवारांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रात शोककळा पसरली
  • अजित पवारांचे २७ वर्षांपासून चालक असलेले श्यामराव मनवे अपघाताच्या आधीच्या रात्रीची माहिती दिली
  • मंगळवारी सर्व बैठका लवकर संपल्याने मनवे यांनी अजित पवारांना पुण्याला कारने जाण्याचा सल्ला दिला होता
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

सागर कुलकर्णी

अजित पवारांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवाराच्या या अचानक जाण्याने सर्वच जण हादरले. पण आता एक गोष्ट समोर आली आहे. अजित पवारांनी ती गोष्ट ऐकली असती तर कदाचित त्यांचा जीव आज वाचला असता. हे दुसरं तिसरं कुणी नाही तर त्यांची 27 वर्षापासून गाडी चालवणारे चालक श्यामराव मनवे यांनी सांगितलं आहे. अपघाताच्या आदल्या रात्री काय झालं होतं याची माहिती त्यांनी या निमित्ताने दिली आहे. 

श्यामराव मनवे हे अजित पवारांचे चालक. अजित पवारांची सावली म्हणूनच त्यांची ओळख आहे. गेल्या 27 वर्षापासून ते अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य करत आहेत. जिथे अजित पवार तिथे श्यामराव असं जणू समिकरण जूळलं होतं. ज्यावेळी अजित पवारांचा अपघात झाला त्यावेळी श्यामराव हे मुंबईत दादांच्या देवगिरी बंगल्यावर होते. त्यांना कुणी तरी अपघात झाल्याची बातमी दिली. पण त्यावर त्यांचा विश्वासच बसला नाही. थोड्या वेळ काही समजलचं नाही असं ही मनवे यांनी सांगितले. 

नक्की वाचा - Ajit pawar Death: डोळ्यात अश्रू, तोंडातून शब्द ही फुटेना, शरद पवारांच्या पहिल्या प्रतिक्रियेने सर्वांनाच रडवले

त्यांचा मृत्यू झाला आहे अशी बातमी दाखवी जात होती. आपल्याला त्यावेळी सु्न्न झाल्यासारखे झाले. काहीच कळत नव्हतं असं ही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी सांगितलं की मंगळवारी सर्व बैठका लवकर संपल्या होत्या. त्यामुळे आपण त्यांना कारने पुण्याला रात्रीतच जावू असं सुचवलं होतं. पण त्यांना जाण्याच टाळलं. त्यांनी त्यावेळी माझं ऐकलं असतं तर हा अनर्थ घडलाच नसता असं श्यामराव मनवे यांनी सांगितलं. हे सांगत असताना त्यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत. 

नक्की वाचा - Ajit Pawar: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढे काय होणार?, 'या' आहेत 5 शक्यता

यावेळी त्यांनी अजित पवारांसोबतच्या आठवणी ही सांगितल्या. अजितदादा हे कडक स्वभावाचे असले तरी तेवढेच मनाने चांगले होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. त्यांच्या जवळ जे काही खाण्यासाठी असेल ते सर्वांना वाटून देत असत. एक लाडू  असला तरी ते चार भाग करत असे ही त्यांनी सांगितले. त्यांच्या जाण्याने काही सुचत नाही. विश्वासही बसत नाही. त्यांना सकाळी गाडीपर्यंत सोडायला आपणच गेलो होते असं ही त्यांनी सांगितलं. बारामतीचीच नाही तर महाराष्ट्राची त्यांच्या जाण्याने हानी झाल्याचं ते म्हणाले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com