Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात पायलटची मोठी चूक? शॉकिंग रिपोर्ट समोर; 'धावपट्टी दिसतेय.....'

सुरुवातीच्या अहवालात लँडिंगवेळी पायलटचीच चूक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटकडून धावपट्टीचा अंदाज चुकला ज्यामुळे ही दुर्घटना घडली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Baramati Plane Crash Investigation Report:  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत दुर्दैवी अंत झाला. या विमान अपघाताचा तपास आता सुरु झाला आहे. सुरुवातीला विमानातील तांत्रिक बिघाड तसेच दाट धुक्यामुळे विमान सुरक्षित लँड झाले नाही, अशी माहिती समोर आली होती. मात्र आता या अपघात प्रकरणात एक धक्कादायक ट्वीस्ट आला असून पायलटच्या चुकीमुळेच ही भयंकर दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

पायलटने केली मोठी चूक..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताचा तपास आता केला जात आहे. या तपासात सुरुवातीच्या अहवालात लँडिंगवेळी पायलटचीच चूक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलटकडून धावपट्टीचा अंदाज चुकला ज्यामुळे ही दुर्घटना घडली. 

Ajit Pawar: महाराष्ट्राचे लाडके 'अजित दादा' अनंतात विलीन! बारामतीचे वादळ 'बारामती'च्याच मातीत शांत

दुसऱ्यांदा लँडिगचा प्रयत्न करताना पायलटकडून चूक झाली. दृश्यमानता कमी असल्याने विमान पुण्याकडे वळवले गेले असावे. पायलटने विमान पुन्हा सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु वेग आणि परिस्थितीमुळे प्रयत्न खूप उशिरा झाला. सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की, पायलटवर वेळेवर लँडिग करण्याचा दबाव होता जो  सामान्यत: प्रत्येक  व्हीआयपी फ्लाइट्स आणि हेलिकॉप्टर ऑपरेशन्ससाठी असतो. मात्र अनंत्रित परिस्थितीवेळी असे करणे धोक्याचे ठरते. विशेषत: काही मिनिटांपूर्वी दृश्यमानता कमी असताना असे करणे धोकादायक होते. सध्या तपास पथकाकडून धावपट्टीचे अंतर आणि घटनांचा क्रम तपासला जात आहे. 

विमान अपघाताचा शॉकिंग रिपोर्ट समोर

अजित पवार यांच्या विमानाचे उड्डाण करणाऱ्या पायलटने मुंबईहून निघाल्यानंतर सकाळी ८:१८ वाजता पहिले लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पायलट सुमित कपूर यांनी खराब हवामान आणि दृश्यमानतेबद्दल एअर कंट्रोल रूमला माहिती दिल्यावर त्यांना एक फेरफटका मारण्याची सूचना देण्यात आली. विमानाने सकाळी 8.45 वाजता दुसऱ्यांदा लँडिंग करण्याचा प्रयत्न केला. एटीसीने पुन्हा विचारले की त्यांना धावपट्टी दिसते का?  आणि त्यांनी होकार दिला. त्यानंतर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो धावपट्टीच्या अगदी जवळच कोसळला.

Advertisement

Ajit Pawar Plane Crash:एका खड्ड्याने केला अजित पवारांचा घात? दाट धुकं, 2 प्रयत्न, हतबल पायलट, विमान का कोसळले?

 व्हीएसआर व्हेंचर्स लिअरजेट ४५ हे विमान बुधवारी सकाळी ८:१० वाजता मुंबईहून उड्डाण केले आणि दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नात सकाळी ८:४६ वाजता कोसळले. बारामती हवाई पट्टी खूप उंचीवर आहे आणि विमान धावपट्टीपासून ५० मीटर अंतरावर उतरले. धडक लागताच एक मोठा स्फोट झाला आणि विमान आगीच्या ज्वाळांनी वेढले. अजित पवार, पायलट सुमित कपूर, सह-वैमानिक शांभवी पाठक आणि उपमुख्यमंत्र्यांचे दोन अंगरक्षकही मृत्युमुखी पडले.