DCM Ajit Pawar Death Plane Crash Reason: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना अजित पवार यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या भयंकर दुर्घटनेने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त आहे. आता या भयंकर दुर्घटनेमागची कारणे समोर येत आहेत.
एका खड्ड्याने घात केला?
सकाळी पावणे नऊच्या सुमाराला बारामती परिसरात दाट धुकं होतं, त्यामुळे व्हिजिबिलिटी म्हणजे दृश्यमानता अत्यंत कमी होती. बारामतीचा रनवे म्हणजे हवाई पट्टी आकाराने लहान आहे आणि तिथे ILS म्हणजे (Instrument Landing Systemची सुविधा नाही बारामतीतला हा टेबल-टॉप रनवे आहे, म्हणजे आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंचावर हा रनवे आहे. त्यामुळे वैमानिकाला पूर्णपणे हाताने आणि डोळ्यांनी पाहून लँडिंग करण्याचा प्रयत्न करावा लागला. विमानाने थेट धावपट्टीकडे जाण्याऐवजी मोठं वळण घेतले. लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला.
त्यानंतर पायलटनं विमान पुन्हा हवेत नेलं आणि फिरवून आणले. दाट धुक्यामुळे धावपट्टीशी सरळ रेषेत विमान आणणं कठीण झाले. त्यानंतर लँडिंगचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान वैमानिकाने MAYDAY कॉल म्हणजे आपत्कालीन मदतीचा संदेश दिला. लँडिंगचा दुसरा प्रयत्न करताना विमान धावपट्टीच्या कडेजवळ कोसळले. बारामतीतला रनवे नंबर 1129 च्या जवळ १५ ते २० फुटांचा खड्डा आहे. या खड्ड्याला धडकल्यामुळे अपघात झाल्याची शक्यता आहे. सुमारे 100 फूट उंचीवरुन विमानाचा तोल गेला. धावपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच विमान जमिनीवर आदळले. विमान आदळताच मोठा स्फोट झाला, त्यानंतर अनेक छोटे स्फोट झाले. विमानाला भीषण आग लागली.
2 प्रयत्न, हतबल पायलट...
लँडिंगच्या आधी विमान गोल फिरत होते याचा अर्थ पायलट तांत्रिक बिघाड शोधण्याचा प्रयत्न करत होते. विमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षित उतरण्याची जागा शोधत होते. आपत्कालीन परिस्थितीत विमान गोल फिरवणे ही एक सामान्य प्रक्रिया असते. बारामती परिसरात वेगाने खाली येत असतानाच फ्लाइट-ट्रॅकिंग सिग्नल अचानक बंद झाले.
फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार, विमान सुमारे 2,600 फूट इतक्या अत्यंत कमी उंचीवर असताना अचानक अतिशय वेगाने आणि अनियंत्रितपणे खाली येऊ लागलं, असं सांगण्यात येते. विमानाचा खाली उतरण्याचा वेग दर मिनिटाला 4,400 फूटांपेक्षा जास्त होता. सामान्य विमान उतरण्याचा वेग साधारणतः 500 ते 1,500 फूट प्रति मिनिट इतका असतो. इतक्या कमी उंचीवर इतक्या वेगानं विमान उतरणं म्हणजे पायलटला विमान सावरण्यासाठी जवळजवळ वेळच मिळत नाही. कमी असणारी दृश्यमानता, धुकं आणि खड्डा यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world