Ajit Pawar Plane Crash Accident Update: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर सध्या शंका उपस्थित केली जात आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विशेषत: रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या कारभारावरुन अनेक प्रश्न उपस्थित केले होते, अशातच आता रोहित पवार यांनीही व्हीएसआर विमानातून प्रवास केल्याचे समोर आले आहे.
रोहित पवार यांनी केला व्हीएसआरमधून प्रवास..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघातावरुन व्हीएसआर या कंपनीच्या कारभारावरुन संताप व्यक्त केला आहे. अशातच आता काही कालावधी आधी रोहित पवार यांनीही व्हीएसआर कंपनीच्याच विमानाने प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणानंतर व्हीएसआर कंपनीच्या कारभाराविषयी रोहित पवार प्रश्न उपस्थित करत असतानाच ही माहिती समोर आली आहे.
रोहित शर्माही सोबत..
रोहित पवार यांनी व्हीएसआर या कंपनीच्या विमानातून मुंबई ते बारामती असा प्रवास केला होता. यावेळी प्रसिद्ध क्रिकेटर, टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माही त्यांच्यासोबत होता. अजित पवार यांच्या अपघातानंतर वादात सापडलेल्या व्हीएसआर कंपनीचे विमान बारामतीला प्रवासासाठी रोहित पवार यांनी वापरले होते, असं सांगण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: 'विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील'; अमोल मिटकरींचे अजित पवारांसाठी काळीज पिळवटून टाकणारं पत्र )