Supriya Sule trolled : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात मृत्यू झाला. शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचं खंद नेतृत्व आणि लोकनेता म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जात होतं. आता कुठे त्यांचं राजकीय नेतृत्व फुलू लागलं होतं. ऐन उमेदीच्या काळात अजित पवारांची अशी एग्झिट मनाला चटका लावणारी आहे.
दरम्यान आज (२९ जानेवारी २०२६) अजित पवार अनंतात विलिन झाले. बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इममामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी देशभरातली बडे नेते उपस्थित होते. याशिवाय मोठा जनसागर दादांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आला होता. यादरम्यान अंत्यसंस्कारावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आहे सुप्रिया सुळेंचा. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी सु्प्रिया सुळे कुटुंबाचा आधार होताना दिसत होत्या. सुप्रिया सुळे यांनी सुनैत्रा पवारांचा हात धरुन त्यांना अजित पवारांच्या पार्थिवापर्यंत नेलं. पार्थ पवार आणि जय पवार यांनाही आधार देत होत्या. दरम्यान एका व्हिडिओमध्ये सुप्रिया सुळे बसणाऱ्यांच्या रांगेत अदलाबदल करताना दिसत आहे. त्यांनी मागे बसलेल्या काही मुलींना पुढे बसण्याची सूचना केली. यामध्ये त्यांची लेक रेवती सुळेदेखील असल्याचं दिसत आहे. यावरुन अनेकांकडून यावर संताप व्यक्त केला जात आहे. अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात इतकं मायक्रो मॅनेजमेंट कशासाठी असा सवाल सोशल मीडियावर काही जणांकडून उपस्थित केला जात आहे. तर काहींनी त्या बॉस लेडीसारखं वागत असल्याचंही म्हटलं आहे.
(या व्हिडिओच्या कमेंटमध्ये विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे)
सुप्रिया सुळे पकड बनवू इच्छित आहेत का?
काही जणांच्या मते ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवर स्वत:ची पकड बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण होण्याची चर्चा असताना सुप्रिया सुळे महत्त्वाची जबाबदारी बजावू इच्छितात असंही म्हटलं जात आहे.
राष्ट्रवादीतील सद्यस्थितीच्या बड्या नेत्या...
अजित पवारांनंतर पवार कुटुंबातील सर्व भावंडांमध्ये सुप्रिया सुळे या मोठ्या आहेत. पवार कुटुंबामध्ये कितीही राजकीय वाद असला तरीही ते कुटुंब म्हणून कायम एक राहिलं. अजित पवार पक्ष फुटून बाहेर गेल्यानंतरही अनेक कार्यक्रमांमध्ये पवार कुटुंब एकत्र आलं आणि त्याचे फोटोही सोशल झाले. अजित पवारांचं अकाली निधन हे पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे या सर्वांना आधार देताना दिसल्या. त्यामुळे सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये त्या सुनैत्रा पवार, पवार कुटुंबाचा आधारवड ठरल्याच्याही प्रतिक्रिया येत आहेत. भावाच्या निधनाचं दु:ख पचवून त्या अनेक ठिकाणी पुढाकार घेताना दिसत होत्या.