EXCLUSIVE: 'राज ठाकरे चांगला माणूस, पण..' एकनाथ शिंदेंचा खोचक टोला, उद्धव ठाकरेंनाही शुभेच्छा देत डिवचलं!

मुलाखतीत शिंदेंनी आपल्या नेहमीच्या नीट आंदोलनावरुन शैलीत ठाकरे बंधुंवर निशाणा साधला तसेच ऑपरेशन टायगरवरुनही जोरदार फटकेबाजी केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

DCM Eknath Shinde Exclusive: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊ शकतात असंही बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एनडीटीव्ही मराठीचे संपादक श्रीरंग खरे, मिलिंद भागवत यांनी प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत शिंदेंनी आपल्या नेहमीच्या नीट आंदोलनावरुन शैलीत ठाकरे बंधुंवर निशाणा साधला तसेच ऑपरेशन टायगरवरुनही जोरदार फटकेबाजी केली. 

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"मुंबईतील आंदोलनात विद्यार्थी होती. दिल्लीत राजीनाम्याचा निर्णय झाला. ठाकरे बंधूनी आधी सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र केंद्रात मोठे निर्णय झाल्यानंतर जंतर मंतरवरीर आंदोलन मागे घेण्यात आल्यांनी याची मोठी निराशा झाली. या जे श्रेय घ्यायचं होतं त्यावर पाणी फेरलं गेले, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. तसेच राज ठाकरे माझे चांगले मित्र आहेत. चांगला माणूस आहे, चांगले नेते आहेत. मात्र आता ते चुकीच्या माणसोबत आहेत," असंही ते म्हणाले. 

यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगरवरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. "आम्ही कुणाचाही पक्ष फोडण्यासाठी जात नाही. आज आमदार, खासदार, कार्यकर्ते, पदाधिकारी आमच्यासोबत का येतात? याचा विचार त्यांनी करण्याची गरज आहे. आपले लोक आपल्याला का सोडत आहेत याचं आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे. त्याच्याकडे असताना ते चांगले, आमच्याकडे आले की वाईट.. 2022 मध्ये आम्ही सत्ता सोडून गेलो, सत्तेवर पाणी सोडले, कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले," असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Advertisement

Instagram Ban: भारतात 25 ऑगस्टच्या रात्रीपासून Instagram बंद? पोस्टने खळबळ, सरकारकडून मोठी अपडेट

ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

तसेच  "आमचा मार्ग, बाळासाहेबांची विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा, विकासाचा अंजेडा घेऊन आम्ही पुढे निघालोय. आमचा मार्ग एकदम स्वच्छ आहे. आमचा अजेंडा खुर्ची किंवा सत्ता नाही. बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन निघालो आहे. जे मला बसता उठता पाण्यात बघतात. रोज शिव्याशाप देतात त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या. सत्तेसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले त्याचवेळी आमचे दोन मार्ग झाले, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छाही दिल्या. आम्ही कुणाचंही वाईट चिंतत नाही. आम्ही आरोप आणि शिव्याशाप देणारे नाही. त्यांना उत्तम निरोग आरोग्य मिळो आणि सद्बुद्धी मिळो, असा टोला त्यांनी लगावला. 

Pune News: कृपया लक्ष द्या! दिवे घाट राहणार बंद; कधी अन् किती वेळ? जाणून घ्या पर्यायी मार्ग