Amravati News : बँकांकडून दिरंगाई, 500 रुपयात सावकारी; शेतकऱ्यांच्या डोक्यावर 255 कोटी कर्जाचा बोजा

विशेष म्हणजे पाचशे रुपयात सावकारीचा परवाना मिळत असल्याने जिल्ह्यात सावकारांची संख्या वाढली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Amravati News : शेतीतून मिळणारं उत्पन्न बेभरवशाचं झालं आहे. यंदाही उन्हाळ्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. टोमॅटोला चांगला भाव येत असल्याने कित्येक शेतकऱ्यांनी शेतात टोमॅटो लावले, परंतू टोमॅटोची आवक काढली आणि वाढलेले भाव अचानक पडले. अवकाळी पावसामुळे कोकणातही आंब्यांच्या बागांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यानी पैशांची जुळवाजुळव करतो आणि शेतीसाठी खर्च करतो. मात्र प्रत्यक्षात निसर्गाची इच्छा नसेल तर शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. अशावेळी शेतकरी पैशांसाठी सावकाराची मदत घेतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अमरावतीत शेतकऱ्यांची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. अमरावतीत वर्षभरात दोन लाख शेतकरी कर्जासाठी सावकारांच्या दारी गेल्याचं समोर आलं आहे. मार्च अखेरीस 635 परवानाधारक सावकारांनी 255 कोटी रुपयांचं कर्जवाटप केलं. शेती बेभरवशाची झाल्याने शेतकऱ्यांना सावकारांच्या दाराचे उंबरठे झिजवावे लागतायेत. बँकांद्वारे कर्ज वाटपात दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांना सावकारांकडे पैशाच्या मदतीसाठी जावं लागत आहे. 

विशेष म्हणजे पाचशे रुपयात सावकारीचा परवाना मिळत असल्याने जिल्ह्यात सावकारांची संख्या वाढली आहे. अमरावती जिल्ह्यात सद्यस्थितीत 635 परवानाधारक सावकार आहे. परवानाधारक सावकार अवैध सावकारीतही गुंतल्याचा आरोप आहे. 

Advertisement

नक्की वाचा - देवाच्या धावा करतानाच मंदिरातील भिंत कोसळली, 8 भाविकांचा मृत्यू, जखमींची संख्या चिंता वाढवणारी

अमरावती जिल्ह्यात किती सावकार?

अमरावती जिल्ह्यात 665 परवानाधारक सावकार 
237 अमरावती तालुक्यात 
अचलपूर 149 
मोर्शी 33 
अंजनगाव 23
धामणगाव रेल्वे 28 
वरुड 40
धारणी 20 
नांदगाव खंडेश्वर 14
चांदुररेल्वे 9 
चांदूर बाजार 42 
तिवसा 18 
दर्यापूर 14