Maratha Reservation : 'मराठा आरक्षण कुणाचंही कमी करून देणार नाही'; उपमुख्यमंत्री शिंदेंचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
मुंबई:

Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा समाजाला दिलेले 10% आरक्षण आजही टिकून आहे. यापुढेही ते टिकवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे स्पष्टीकरण देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरुन राजकारण करणाऱ्या विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांनी केवळ मतांसाठी मराठा समाजाचा वापर केला आणि सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर मराठा आरक्षण कुणाचंही कमी करुन देणार नाही, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. 

मराठा आरक्षणाबाबत विरोधक अपयशी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला न्याय देण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख केला. "मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. आजही त्या आरक्षणाचा लाभ समाजाला मिळत आहे," असं त्यांनी सांगितलं. याव्यतिरिक्त, कुणबी नोंदीसाठी न्यायमूर्ती शिंदे समितीची स्थापना, 'सारथी' संस्थेमार्फत विविध कोर्सेस, अण्णासाहेब विकास महामंडळातून बिनव्याजी कर्ज आणि विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलसाठी भाडे देण्याची योजना यांसारख्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला.

फडणवीस सरकारच्या काळात मिळालेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकले होते, पण सर्वोच्च न्यायालयात महाविकास आघाडी सरकारला ते टिकवता आले नाही, अशी टीका त्यांनी केली. "त्या काळात आरक्षणासाठी लक्ष द्यायला हवं होतं. दुर्दैवाने ते झालं नाही," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

( नक्की वाचा : Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया )
 

'कुणाचंही आरक्षण कमी करणार नाही'

मराठा समाजाला आरक्षण देत असताना सरकार कोणत्याही समाजावर अन्याय करणार नाही, असं शिंदे यांनी ठामपणे सांगितलं. "ओबीसी समाजाचं आरक्षण कमी करून मराठ्यांना मिळावं अशी मराठा समाजाची भूमिका नाही. कुणाचंही आरक्षण कमी करून देणं हे करता येणार नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं. कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.

Advertisement

'सामना' मधून टीका करणाऱ्यांवर पलटवार

विरोधकांवर टीका करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत असताना 'सामना'मधून कोणी टीका केली, हे सर्वांना माहित आहे. "महायुतीने दिलेलं आरक्षण ते टिकवू शकले नाहीत, आणि आता ते फक्त निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत," असे ते म्हणाले. बैठकीला न येता बाहेरून टीका करणाऱ्या विरोधकांनी त्यांची दुटप्पी भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. "सरकारचं काम गोळ्या घालण्याचं नाही, हे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे," असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

( नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्याचे लाईव्ह अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा )
 

Topics mentioned in this article