Manoj Jarange Patil Protest Mumbai LIVE Updates: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात निघालेले मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. आज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर मोर्चाला बसणार आहेत. आज पहाटेच मनोज जरांगे पाटील यांच्यासह हजारो वाहनांनी मुंबईमध्ये प्रवेश केला. मराठा बांधवांच्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. प्रशासनानेही त्यादृष्टीने तयारी केली असून आझाद मैदानावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
Live Update: जरांगें विरोधात तक्रार दाखल करणार, सदावर्ते
मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी तक्रार दाखल केली आहे. मराठा आंदोलकांनी आपल्याला धमकी दिली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
Deputy CM Eknath Shindes Big Statement on Maratha Reservation
Eknath Shinde on Maratha Reservation : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

Manoj Jarange Patil Live News: जरांगेंसारख्या माणसाला पायघड्या घालत असतील तर आम्हीही संघर्ष यात्रा काढू: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंना ज्या ज्या नेत्यांचा पाठिंबा आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की ओबीसी आरक्षणाबाबत तुमची भूमिका काय आहे? सत्ताधारी पक्षांचाही मनोज जरांगेंना पाठिंबा आहे. अजित पवारांचे आमदार समर्थन करतात. ते त्यांना अडवत नाहीत. मनोज जरांगेंसारख्या फुळचट माणसाला पायघड्या घालत असतील तर आम्हीही संघर्ष यात्रा काढू, सरकारला जी भाषा करते त्यासाठी सज्ज व्हावे लागेल. उद्या आम्ही बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करु. आम्ही ५० टक्के एकत्र आले तर तुमचे काय होईल?
ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ घेऊन जावं. अन्यथा ओबीसी तुम्हाला मान्य करणार नाही. ओबीसीमधून कोणालाही आरक्षण मिळणार नाही, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आंदोलनाला पाठिंबा द्यावा पण मागणी कायदेशीर असावी. लक्ष्मण हाके या महाराष्ट्रातील व्यवस्थेमध्ये संविधानिक प्रश्न उपस्थित करतोय. लक्ष्मण हाके चुकीचा आहे असं कोणता नेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहे तो दाखवा? मी सर्वसामान्य आंदोलक आहे. माझा आवाज जर चुकीचा असेल, संविधानविरोधी वागत अशेल तर शासनाने मला उचलून आतमध्ये टाकायला हवं.
मागण्या अशा असाव्यात ज्या मान्य होतील, मनोज जरांगेंच्या मोर्चावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची प्रतिक्रिया
मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री
मनोज जरांगे पाटील आज मुंबईत उपोषणासाठी बसले आहेत
मराठा समाजाला जे जे शक्य आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं
मागण्या अशा असाव्यात ज्या मान्य होतील
कायद्याच्या चौकटीत बसून देता येणाऱ्या गोष्टी सरकार त्यांना देईल
मी स्वतः मराठवाड्यातील आहे, सरकारने कुणबी प्रमाणपत्र दिली आहेत
Manoj Jarange Patil Live News : अटल सेतूवर वाहनांच्या लांबच लांब रांग
मुंबई मराठा बांधवांची मोठी गर्दी
हजारो वाहनांसह मराठा बांधव मुंबईत दाखल
अटल सेतूवर वाहनांच्या लांबच लांब रांग
...तर ओबीसी समाज दहा पटीने एकत्र येऊन आंदोलन करणार, आमदार परिणय फुके यांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या आणि आंदोलन संविधानिक मार्गाने केलं पाहिजे. संविधानाच्या चौकटीत बसणारी मागणी त्यांनी करावी, मराठा समाजासाठी योजना असतील किंवा स्वतंत्र आरक्षण मागणी त्यांनी करावी. मात्र ओबीसीतूनच आरक्षण मिळावे ही मागणी करून ते गणेशोत्सवादरम्यान कुठेतरी मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने दबावात येऊन ओबीसीविरोधात निर्णय घेतला तर ओबीसी समाज दहा पटीने एकत्र येऊन आंदोलन करणार, असा इशारा आमदार परिणय फुके यांनी दिला आहे.
...तर ओबीसी समाज दहा पटीने एकत्र येऊन आंदोलन करणार, आमदार परिणय फुके यांचा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या आणि आंदोलन संविधानिक मार्गाने केलं पाहिजे. संविधानाच्या चौकटीत बसणारी मागणी त्यांनी करावी, मराठा समाजासाठी योजना असतील किंवा स्वतंत्र आरक्षण मागणी त्यांनी करावी. मात्र ओबीसीतूनच आरक्षण मिळावे ही मागणी करून ते गणेशोत्सवादरम्यान कुठेतरी मुंबईला वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने दबावात येऊन ओबीसीविरोधात निर्णय घेतला तर ओबीसी समाज दहा पटीने एकत्र येऊन आंदोलन करणार, असा इशारा आमदार परिणय फुके यांनी दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही- मुधोजी राजे भोसले
मराठा समजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे अशी भूमिका नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले घेतली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याल्या आमचा विरोध असल्याचं मुधोजी राजे भोसले यांनी म्हटलं.
Manoj Jarange Patil Live News : मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मराठा आंदोलकांची तारांबळ
मुंबईला पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये तारांबळ उडाली
सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात मराठा कार्यकर्त्यांनी मुंबई येथील आझाद मैदानाच्या बाहेर तुफान गर्दी केली होती
Manoj Jarange Patil Morcha: आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीला पोहचले
Manoj Jarange Patil Mumbai Morcha LIVE: आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके जरांगेंच्या भेटीला पोहचले
Manoj Jarange Patil Live News : गोळ्या घातल्या तरी आता मागे हटत नाही- मनोज जरांगे
सगळ्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडत नाही ,गोळ्या घातल्या तरी आता मागे हटत नाही
मराठ्याला आरक्षण आणि गुलाल टाकल्याशिवाय येथून हटायाचे नाही
जे मैदान दिले नाही तिथेच झोपायचं
आता मी आझाद मैदानात आहे, त्यामुळे आता तुम्ही 50 किलोमीटरपर्यंत झोपा
वाशीला आंदोलकांची सोय केली आहे
Manoj Jarange Patil Live News: सरकारने सहकार्य केलं म्हणून आपणही सरकारला सहकार्य केलं पाहिजे- मनोज जरांगे
मनोज जरांगे
आपलं ठरलं होतं उपोषण आझाद मैदानावरच करायच, त्याप्रमाणे आपण आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे.
सरकार आपल्याला सहकार्य करत नव्हतं, म्हणून मराठ्यांनी ठरवलं होतं मुंबईत जायचं आणि मुंबई जाम करायची आणि ती आपण केली. आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे, आंदोलनाला परवानगी दिली आहे. त्याबद्दल आपण सरकारचं कौतुक देखील केलं आहे. मात्र आता सरकारने सहकार्य केलं म्हणून आपणही सरकारला सहकार्य केलं पाहिजे.
Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे आझाद मैदानात पोहोचले, उपोषणाला सुरुवात
मनोज जरांगे आझाद मैदानात पोहोचले
मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात करत असल्याची घोषणा केली
आझाद मैदानाबाहेर मराठा आंदोलकांची गर्दी
Manoj Jarange Patil Live News : आता आश्वासन नको, आरक्षण हवं
आता आश्वासन नको, आरक्षण हवं, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया
आता थापा ऐकायच्या नाही, ओबीसीमधून मराठा आरक्षण हवं
वर्षभर इथे बसावं लागलं तरी चालेल, मात्र मागे हटणार नाही
Manoj Jarange Patil Live News : आता आश्वासन नको, आरक्षण हवं
आता आश्वासन नको, आरक्षण हवं, मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया
आता थापा ऐकायच्या नाही, ओबीसीमधून मराठा आरक्षण हवं
वर्षभर इथे बसावं लागलं तरी चालेल, मात्र मागे हटणार नाही
Manoj Jarange Patil Live News : मुंबईत रात्री पाऊस पडल्याने आझाद मैदानात ठिकठिकाणी पाणी साचलं
मुंबईत रात्री पाऊस पडल्याने आझाद मैदानात ठिकठिकाणी पाणी साचलं
चिखलात बसूनही मराठा बांधव आंदोलनावर ठाम
सरकारने आम्हाला खेळवलं आहे, आम्ही दुप्पट ताकदीने मुंबईत आलो आहोत
आमचा रोष आता सरकारला झेपणार नाही, आंदोलकांचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Live News : हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल
हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल
VIDEO | Maharashtra: Maratha quota agitation leader Manoj Jarange reached Mumbai Friday morning, hours ahead of his protest at Azad Maidan in the city.
— Press Trust of India (@PTI_News) August 29, 2025
Accompanied by hundreds of vehicles, Jarange, who began his march from his village in Jalna district on Wednesday, was welcomed… pic.twitter.com/zhPkIylHJN
Manoj Jarange Patil Live News : दक्षिण मुंबईत पार्किंगला जागा संपली
दक्षिण मुंबईत पार्किंगला जागा संपली
पोलिसांनी वाहने अडवल्याने वाहने सोडून आंदोलन पायी आझाद मैदानाकडे निघाले
Manoj Jarange Patil Live News : दक्षिण मुंबईत पार्किंगला जागा संपली
दक्षिण मुंबईत पार्किंगला जागा संपली
पोलिसांनी वाहने अडवल्याने वाहने सोडून आंदोलन पायी आझाद मैदानाकडे निघाले
Manoj Jarange Patil Live News : गनिमी काव्याने मराठा आंदोलकांची मुंबईत एंट्री
गनिमी काव्याने मराठा आंदोलकांची मुंबईत एंट्री
पोलीस एकावेळी हजारो वाहनांना प्रवेश देणार नाहीत, म्हणून गनिमी कावा
५०० वाहने, ५ हजार आंदोलकांसह जरांगे आझाद मैदानावर प्रवेश करतील
जरांगे शिवनेरीत असताना लाखो आंदोलक वाहनांनी गुरुवारीच मुंबईत दाखल
उर्वरित मराठा आंदोलक मुंबईत इतर भागांत वाहनांनी जाऊन कोंडी करतील
Manoj Jarange Patil Live News: भगवं वादळ मुंबईत दाखल, मनोज जरांगेंसोबत हजारो मराठा बांधव
भगवं वादळ मुंबईत दाखल, मनोज जरांगेंसोबत हजारो मराठा बांधव
Manoj Jarange Patil Live News: मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजपचा विरोधकांवर निशाणा
मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? …
मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? …
— Keshav Upadhye (@keshavupadhye) August 29, 2025
▪️महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष
▪️मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मो’र्चा म्हणून हेटाळणी करणारे सामना
▪️आरक्षणचे…
Manoj Jarange Patil Live News : मुंबईकरांना आम्हाला कुठलाही त्रास द्यायचा नाही, आम्हाला सरकार्य करा- आंदोलक
मुंबईकरांना आम्हाला कुठलाही त्रास द्यायचा नाही, आम्हाला सरकार्य करा- आंदोलक
सरकारने आमच्यासाठी कोणतीही सोय केली नाही, आंदोलकांचा आरोप
आम्हाला जाणूनबुजून आम्हाला वाहतूक कोडींत सरकारने अडकवलं
सरकारने नियोजन केले नाही तर आम्हाला रस्त्यावर थांबावं लागेल
मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही, म्हणून सरकारने काहीतरी नियोजन केले पाहिजे
Manoj Jarange Patil Live News : मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
मुंबई पोलिसांसमोर वाहतूक सुरळीत करण्याचं मोठं आव्हान
Manoj Jarange Patil Live News : मुंबईत अनेक ठिकाणी पार्किग फूल
मुंबईत अनेक ठिकाणी पार्किग फूल
मराठा आंदोलकांच्या हजारोंच्या संख्येने गाड्या मुंबईत दाखल
मुंबईकरांना वाहतूक कोडींचा सामना करावा लागण्याची शक्यता
Manoj Jarange Patil Live News : मराठा आंदोलकांना सरकारने घातलेली 5000 आंदोलकाची अट मोडली
मराठा आंदोलकांना सरकारने घातलेली 5000 आंदोलकाची अट मोडली
आझाद मैदानापासून ८ किलोमीटर अंतरावरती मनोज जरांगे पाटील असतानाच हजारोंच्या संख्येने आंदोलन मैदानात
सरकारची 5000 आंदोलकांची अट होती, न्यायालयाच्या सूचनेनुसार दिलेल्या अटीच उल्लंघन