मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, पुण्यातील 'त्या' व्यक्तीसाठी पहिली स्वाक्षरी

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पहिली स्वाक्षरी केली आहे. पुण्यातील एका रुग्णाच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत दिली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.