'मी आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसं भेदायचं हे जाणतो'; अभूतपूर्व यशानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Election Results 2024 LIVE Updates: कोण होणार मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला जवळपास 133 जागांपर्यंत पोहोचण्यात यश आलं आहे. 288 पैकी महायुतीने 231 जागांवर विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या अभूतपूर्व यशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूह कसं भेदायचो हे जाणतो, अशा शब्दात त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.   

नक्की वाचा - Election Results 2024: महाराष्ट्र निवडणूक निकाल : विधानसभेच्या मोठ्या लढतीमध्ये सध्या काय आहे स्थिती?

विधानसभेच्या अभूतपूर्व यशानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...

विधानसभेत फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता. त्याच्या विरोधात लढणाऱ्या राष्ट्रीय विचारांच्या संघटनांचा विजय आहे. मविआने मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे विविध पंथाचे संतांचा हा विजय आहे.  महाराष्ट्रातील महायुतीच्या लाखो कार्यकर्तांचा विजय आहे. एकनाथ शिंदे, मी, अजित पवार, रामदास आठवले आणि आमचे मित्रपक्ष यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. राज्यातील महायुतीचे लाखो कार्यकर्त्यांचा विजय आहे.

आज प्रचंड मोठा विजय मिळालेला आहे. यानिमित्ताने मी अमित शहा यांचे आभार मानतो. ज्यांनी महाराष्ट्रात येऊन कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली. जे.पी नड्डा, गडकरी, राजनाथजी या सर्व राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. त्या सर्वांनी विजयामध्ये हातभार लावला. राज्याच्या जनते पुढे आम्ही नतमस्तक आहोत. आज जास्त बोलताच येत नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला अक्षरश: साक्षात दंडवत. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला इतकं प्रेम दिलंय आणि विषारी प्रचाराला कृतीतून उत्तर दिलंय.  

Advertisement

नक्की वाचा - Maharashtra Election Result 2024 : ते पुन्हा आले ! फडणवीसांच्या दमदार यशाचं रहस्य काय?

मी यापूर्वी म्हटलं होतं की, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. मी चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तुटला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. मी लाडक्या बहीण, लाडके भाऊ आणि लाडक्या शेतकऱ्यांचे आभार मानतो. लोकसभेत जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता.

Advertisement

आमच्या पक्षाने केवळ भाजपचं नाही तर मित्रपक्षांच्या जागांवरही काम केलं. मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूह कसं भेदायचो हे जाणतो. या विजयात माझा छोटा सहभाग आहे. लोकशाहीत चांगला विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. त्यांचा आवाज छोटा असो वा मोठा ते जे योग्य सांगतील, त्याचा सन्मान असेल. पराभवाची खरी कारणं काय याचा विरोधकांनी विचार करायला हवा. 

मुख्यमंत्री कोणाचा होईल?
मुख्यमंत्रिपद कशाच्याही निकषावर नाही. तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील. हे यापूर्वी अमित शहा यांनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री पदावरुन आमच्यात  कोणताही वाद नाही.  या निकालाने एक स्पष्ट झालंय की, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा हा अजित पवारांकडेच आहे. 
 

Advertisement