मोसिन शेख, छत्रपती संभाजीनगर: 'काही लोकांनी भगव्याशी गद्दारी सुरु केली, मतांची लाचारी सुरु केली. अलिकडच्या काळामध्ये शिवसेनाप्रमुखांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची लाज वाटायला लागले. आता ते त्यांना जनाब बाळासाहेब म्हणतात ही शोकांतिका आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगर येथे महायुतीचे उमेदवार अतुल सावे तसेच संजय शिरसाट यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी एमएमएमच्या ओवेसींसह काँग्रेसवरही जोरदार टीका केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी आपण एकत्र आलो. ओवेसी, छत्रपती संभाजीनगर ऐकून घ्या. कुणाचा बाप पैदा झाला तरी आता हे नाव बदलणार नाही. काल एमएआयएमची सभा झाली. यामध्ये एक महिला म्हणाली, कोण हा संभाजी राजा? त्यांना माहित नाही. देश धरमपर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महाप्रतापी महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभूराजा था. ज्या संभाजीराजेंना पकडण्यासाठी औरंगजेब या संभाजीनगरमध्ये येऊन बसला, पण 9 वर्ष त्यांना झुंझवत ठेवलं नाही. औरंग्या जर फितुरी झाली नसती तर कधीच ते हाती लागले नसते. ज्या औरंगजेबाचे थडग याठिकाणी तयार झालं त्याचे नाव या शहराला राहू शकत नाही. म्हणून आपल्या महायुती सरकारने महापराक्रमी, परमप्रतापी छत्रपती संभाजीराजेंचे नाव या शहराला दिले आहे. मात्र ज्यांचे मनसुबे रक्षा रक्षाकारांचे राज्य आणण्याचे आहेत, त्यांना सांगतो आता आम्ही जागे झालो आहोत, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
'लोकसभेत व्होट जिहाद झाला..'
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला लक्षात आलं, यांनी नवीन पद्धती सुरु केल्या आहेत. आता वोटजिहाद सुरु झालं आहे. लोकसभेच्या १० मतदार संघामध्ये झालेला वोट जिहाद आपल्या पराभवाचे कारण ठरले. कारण आपण जागे नव्हतो,आपण एकत्र नव्हतो. म्हणून योगिजींनी सांगितलं बटेंगे तो कटेंगे. मोदिजींनीही संदेश दिलाय, एक रहेंगे तो सेफ रहेंगे. आता भगव्याचा एकत्रित हुंकार याठिकाणी दिसलं पाहिजे. छत्रपती संभाजीनगर कालही
भगवे होते. आजही भगवे राहणार आणि २३ तारखेलाही भगवे राहणार हे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठाकरेंवर टीका
यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला. काही लोकांनी भगव्याशी गद्दारी सुरु केली, मतांची लाचारी सुरु केली. अलिकडच्या काळामध्ये आमच्या नेत्यांना शिव शिवसेनाप्रमुखांना हिंदुह्रयसम्राट म्हणण्याची लाज वाटायला लागले. आता ते त्यांना जनाब बाळासाहेब म्हणतात ही शोकांतिका आहे. म्हणून ही साधी निवडणूक नाही, आपली एकजुट दाखवण्याची निवडणूक आहे. जे लोक रझाकारांचे राज्य आणू पाहतात, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा चुराडा करायचा आहे. ते व्होट जिहाद करणार असतील तर आपण मतांसाठी धर्मयुद्ध केले पाहिजे, असं ते म्हणाले.