Dhananjay Munde On Anjali Damania : धनंजय मुंडे यांनी कृषिमंत्री असताना जवळपास 245 कोटींचा घोटाळा केल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. दमानिया यांच्या या आरोपांना आता धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप धादांत खोटे आहेत. त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणारे हे आरोप आहेत, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अंजली दमानिया यांनी ज्या निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला ती निविदा प्रक्रिया नियमाप्रमाणे आणि शासनाच्या धोरणाला अनुस्वरुनच राबवली गेली होती. मागील अनेक दिवसांपासून त्या वेगवेगळे आरोप करत आहेत. त्यातला एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही, असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
नक्की वाचा - Anjali Damania : धनंजय मुंडेंवर 245 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, अंजली दमानियांनी पुरावेच सादर केले
महाराष्ट्रातील जनता हे सर्व पाहत आहेत. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांपैकी फरार आरोपीची हत्या झाल्याचाही आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. असे सनसनाटी आरोप करायचे आणि स्वत:ची प्रसिद्धी करायची आणि दुसऱ्याची बदनामी करायची. आज केलेल्या आरोपांतही मला दुसरं काही आढळून येत नाही. आज 58 वा दिवस आहे माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. का सुरु आहे? कोण चालवतंय मला माहिती नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले.
डीबीटीमध्ये काय असावं आणि काय नसावं याचे अधिकार नियमानुसार कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे आहेत. नियमानुसारच हे सर्व झाले आहे. अर्थमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संमतीनेचे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. पेरणी आणि पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी मान्सूनआधी तयार करुन ठेवाव्या लागतात. म्हणून एप्रिल-मे महिन्यात लागणारी लोकसभेची आचारसंहिता आणि जून महिन्यात सुरु होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मार्च महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली, असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं.
काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत नॅनो खतांची किंमत एकच आहे. राज्यात त्यापेक्षा कमी किंमतीत नॅनोच्या खताची खरेदी करण्यात आली. चार लाख शेतकऱ्यांना याचं वाटप करण्यात आलं आहे. 200 रुपये बाटलीसह ड्रोनद्वारे फवारणीसाठी शेतकऱ्यांना एकूण 600 रुपयांचा एकरी खर्च आला. नॅनोचा वापर जास्तीत जास्त केला तर खतांची खरेदी करणे कमी होईल. याशिवाय नॅनोमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होते. यात कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. मला बदनाम करण्याचं काम अंजली दमानिया करत आहेत, असा उलट आरोप धनंजय मुंडे यांनी केला.
निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ
निविदा प्रक्रिया पूर्वमान्यतेनेच राबवण्यात आली. जास्तीत जास्त कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी व्हावे यासाठी यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. भ्रष्टाचार करायचा असेल तर दोन वेळा मुदतवाढ कोणं देईल का? स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया व्हावी यासाठी दोनदा मुदवाढ दिली. नॅनो खत निर्माती कमी इफकोचे दर पाहिल्यावर लक्षात येईल की देशभर कंपनीचे नॅनो खताचे समान दर आहेत. त्यामुळे यात तफावर आहे, भ्रष्टाचार झाला हे म्हणणं म्हणजे शेतकरी, महाराष्ट्राच्या जनतेला आणि माध्यमांनाही फसवण्यासारखं आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
आम्ही शांत बसलोत असं कुणीही समजू नका
अंजली दमानिया यांनी बदनामी करण्यापलिकडे काही केलं नाही. माझं मीडियाला चॅलेन्ज आहे की त्यांची केलेला एकतरी आरोप या राज्यात किंवा देशात टीकला का? सत्यात उतरला का? त्यांना परत राजकारणात यायंच असले. त्यामुळे कदाचित न्यूज व्हॅल्व्यू वाढवण्याचं त्याचं काम सुरु असेल. मात्र आम्ही शांत बसलोत असं कुणीही समजू नका. आम्हाला बोलता येत नाही, असं समजू नका, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.