जाहिरात

Dhananjay Munde resignation : आताची सर्वात मोठी बातमी; धनंजय मुंडेंनी काल रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवला

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती.

Dhananjay Munde resignation : आताची सर्वात मोठी बातमी; धनंजय मुंडेंनी काल रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवला

Dhananjay Munde : संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून निघाला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला तुरुंगात व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याच्या घटनांवरुन महायुतीला घेरलं जात आहे. दरम्यान राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. धनंजय मुंडे यांनी काल 3 मार्चला रात्रीच पक्षाकडे राजीनामा सोपवल्याचं समोर आलं आहे.  आज राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावर औपचारिक निर्णय घेतील अशी माहिती आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप होत होते. विरोधी पक्ष, अंजली दमानिया, मनोज जरांगे यांनी आधीपासूनच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 

Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न

नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न

संतोष देशमुखांचा हत्या कशी झाली? 

मन विचलित करणारे हे असे फोटो आहेत. किती क्रूरपणे हत्या केली गेली असेल, याचा अंदाज हे फोटो पाहिल्यानंतर येतो. कोणी दांडक्याने मारत आहे तर कोणी मानेवर पाय ठेवला आहे. त्यांच्यावर अत्याचार केले जात असताना कोणीतरी खिदीखिदी हसत आहे. कोणी व्हिडीओ काढताना वेडेवाकडे चाळे करत आहे. त्यात संतोष देशमुख यांचा पूर्ण चेहरा सुजलेला दिसत आहे. ते जमिनीवर गतप्राण पडले आहेत. त्या अवस्थेतही त्यांना मारलं जात आहे. अशा पद्धतीचे हे फोटो आता समोर आले आहेत.