Dharashiv News: निवडणुकीत अंधश्रद्धेचा खेळ! उमेदवाराच्या फोटोवर जादूटोणा, दृश्य पाहून खळबळ

शहरातील एका प्रार्थनास्थळात प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dharashiv Black Magic News: निवडणुकीच्या प्रचारातही अंधश्रद्धेचा भयंकर खेळ सुरु असल्याचा प्रकार धाराशिवमधून समोर आला आहे. धाराशिवमध्ये जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुया, दाभण टोचूण तो काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवल्याने खळबळ उडाली आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. 

निवडणुकीच्या प्रचारातही अंधश्रद्धेचा खेळ!

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  परंडा नगरपरिषदेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच जादूटोण्याचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका प्रार्थनास्थळात प्रमुख उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर करून जादूटोणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

V. Shantaram Movie : ‘व्ही. शांताराम' मोठ्या पडद्यावर झळकणार, पहिलं पोस्टर आऊट; कोण साकारणार भूमिका?

जनशक्ती नगरविकास आघाडीच्या उमेदवारासह समर्थक नेत्यांच्या फोटोला सुया, दाभण टोचण करून काळ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवले होते, यावर ठाकरे गटाने संताप व्यक्त केला आहे. कितीही सुया टोचल्या तरी फरक पडणार नाही जनता तुमच्या त्रासाला कंटाळली असल्याची टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली. त्यावर ठरवून केलेल्या माणसाला याची माहिती असते, याची चौकशी करा अशी मागणी परंडा नगरपरिषदेत शिवसेनेचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी केली.

पंचक्रोशीत रंगली चर्चा

दरम्यान, परांडा पालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेना आणि जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात थेट लढत आहे. गेल्या काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यांवर जोरदार प्रचार सुरू होता. मात्र, जादूटोण्याचा हा प्रकार रविवारी उघडकीस आला. या प्रकाराबद्दल अद्यापपर्यंत कोणीही अधिकृत तक्रार दाखल केली नाही. मात्र राजकीय वर्तुळात या प्रकाराची चांगलीच चर्चा होत आहे.

Advertisement

Akola News : निवडणुकीचं वातावरण बिघडलं, उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, लोखंडी पाईपने डोकं फोडलं