जाहिरात

VIDEO: हसत हसत निरोपाचे भाषण, पुढच्याच क्षणी विद्यार्थीनीचा जीव गेला; हृदयद्रावक VIDEO

Dharashiv Collage Girl Death Video: एक विद्यार्थीनी भाषण करता करताच चक्कर आल्याने कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

VIDEO: हसत हसत निरोपाचे भाषण, पुढच्याच क्षणी विद्यार्थीनीचा जीव गेला; हृदयद्रावक VIDEO

ओंकार कुलकर्णी, धाराशिव:

Dharashiv Girl Heart Attack Video: मागील काही वर्षांपासून हदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच हार्ट अटॅकचे धोके जानवत आहेत. सहज चालता बोलता, जीममध्ये, मैदानावर, जेवणाच्या ताटावर हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत, ज्याचे व्हिडिओही समोर येत असतात. अशातच धाराशिवमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, धाराशिव जिल्ह्याच्या परंडा शहरातील रा.गे शिंदे महाविद्यालयातील एक विद्यार्थीनी भाषण करता करताच चक्कर आल्याने कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. वर्षा खरात असे या मृत विद्यार्थीनीचे नाव असून ती बिएसीची वर्गात शिकत होती.

रा.गे शिंदे महाविद्यालयामध्ये बीएससीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात वर्षा खरात भाषण करत होती. स्टेजवर हसत हसत भाषण करत असतानाच वर्षाला अचानक भोवळ आली अन् ती खाली कोसळली. त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 

या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विद्यार्थीनी स्टेजवर भाषण करत आहे. भाषण करता करता शब्दांच्या कोट्या करत ती  विद्यार्थ्यांना हसवत होती. अचानक तिला भोवळ आली अन् ती खाली कोसळते. हा प्रकार पाहून कार्यक्रमात एकच गोंधळ उडतो.

दरम्यान, हसता खेळता, निरोप समारंभाचे भाषण करतानाच विद्यार्थीनीने अखेरचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

(नक्की वाचा- मूल दत्तक घ्या! 'अ‍ॅडव्हान्सचा राग...', तनिषा भिसेंच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालयाचा खुलासा)