
रेवती हिंगवे, प्रतिनिधी:
Pune Deenanath Mangeshkar Hospital News: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या धर्मादाय रुग्णालयाने पैसे न भरल्याने एका गर्भवती महिलेवर उपचारास नकार दिला ज्यानंतर दोन जुळ्या बाळांना जन्म दिलेल्या महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आज रुग्णालयासमोर आंदोलने केली जात आहेत. अशातच तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी गठीत करण्यात आलेल्या रुग्णालयाच्या समितीने दिलेला प्राथमिक अहवाल समोर आला आहे, एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीसंदर्भात रुग्णालय प्रशासनाने हा महत्त्वाचा खुलासा केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे रुग्णालयाचा खुलासा?
1. सौ. मिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्र व वाहिन्यांवर प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत मिसे) या 2020 पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या.
2. सदर महिला रुग्णाची 2022 साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये 50 टक्के चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती.
3. 2023 साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्याविषयी सल्ला देण्यात आला होता.
4. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो कि आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी 3 वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही.
5. 15 मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर पैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnancy बद्दल डॉक्टर पैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर 7 दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी 22 तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत.
(नक्की वाचा- महिलेच्या जाळ्यात फसला! 150 रुपयांचा मोह, सागर कारंडेकडून 60 लाख लुटले, कसा झाला स्कॅम?)
6. 28 मार्च 2025 शुक्रवार रोजी सकाळी 11.30 वाजता सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते Emergency किंवा Labour Room मध्ये आले नव्हते, याची कृपया नोंद घ्यावी.
डॉक्टर पैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy & caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली.
कमी वजनाची, 7 महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी 2 ते 2.5 महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये 10 ते 20 लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये 2 ते2.5 लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले. असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना श्री सचिन व्यवहारे यांनी फोनवर दिला. रुरणाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चैरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले.
(नक्की वाचा- Shirdi News : कुणी निवृत्त PSI तर कुणी फाड-फाड इंग्रजी बोलतंय; शिर्डीत 80 भिकाऱ्यांची धरपकड)
डॉक्टर पैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. पैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world