नागिंद मोरे, धुळे
पैशांचा पाऊस पाडून देतो असं सांगून लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपींनी पैसे परत न देता बंदुकीतून हवेत गोळीबार केल्याचेही समोर आले आहे. धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेरमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी चौघा संशयित आरोपींच्या धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आणि सांगवी पोलिसांनी मध्यप्रदेश येथून मुसक्या आवळल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या दोघा जणांनी आम्ही पैशांचा पाऊस पाडून देतो असे सांगून फसवणूक केली. मध्यप्रदेश येथील चौघांनी पैसे पाडून देण्याच्या बदल्यात दीड लाख रुपये देणार असा व्यवहार ठरला होता. मात्र पैसे देऊनही पैशांचा पाऊस न पडल्याने पीडितांनी दिलेले दीड लाख रुपये परत मागितले.
(नक्की वाचा - Pune Crime News: 100 रुपयांची केला घात, लाडकी दांडक्याने मारहाण करत एकाची हत्या)
मात्र आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला आणि त्यादरम्यान त्यांच्यात झालेल्या झटापटीत दोन फायर बंदुकीतून देखील झाडण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास करून मध्यप्रदेश येथून चौघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच आरोपींनी वापरलेली बंदूक देखील ताब्यात घेतली असून गुन्हा दाखल कला आहे.
(नक्की वाचा- फक्त 20 रुपयात टक्कल दूर करण्याचा उपाय! इतकी गर्दी की रस्ते झाले जाम, पाहा Video)
या प्रकरणी पैशांचा पाऊस पाडून देण्याच अमिष दाखवणाऱ्या दोघांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही माहिती दिली.