जाहिरात

Pune Crime News: 100 रुपयांची केला घात, लाडकी दांडक्याने मारहाण करत एकाची हत्या

Pune Crime News : बाळू पोखरकर (41 वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर राहुल गुळवे असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News: 100 रुपयांची केला घात, लाडकी दांडक्याने मारहाण करत एकाची हत्या

अविनाश पवार, पुणे

दारू पिण्यासाठी उसने दिलेले 100 रुपये परत केले नाही म्हणून एकाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगावमध्ये ही घटना घडली आहे. बाळू पोखरकर (41 वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर राहुल गुळवे असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा-  अंतरिम जामीन असूनही आरोपीला पोलिसांची बेदम मारहाण, आरोपीच्या हाताला झालं फ्रॅक्चर)

नारायणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू पोखरकर याने राहुल भाऊसाहेब गुळवे याला दारू पिण्यासाठी एक आठवड्यापूर्वी 100 रुपये दिले होते. राहुळकडून हे पैसे तो वारंवार मागत होता. मात्र हे पैसे परत न दिल्याने बाळू पोखरकर याने राहुल गुळवे याला नारायणगाव बस स्थानकात मोठमोठ्याने शिवीगाळ केली.

(नक्की वाचा-  'तु मेलास तरी माझी मुलगी सुखी राहू शकते' सासऱ्यानं हिणवलं, जावयानं भयंकर पाऊल उचललं)

शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून राहुल गुळवे याने बाळू पोखरकर याच्यावर शनिवारी रात्री नारायणगाव बस स्थानकाच्याजवळ हल्ला केला. बस स्थानकाच्या मोकळ्या जागेत नेऊन बाळूला दांडक्याने मारहाण केली आणि डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com