
नागिंद मोरे
कोर्टाच्या एका आदेशाची चर्चा सध्या धुळ्यात चांगलीच रंगली आहे. कोर्टाने आपल्या आदेशाने एक प्रकारे सरकारी अधिकाऱ्याच्या खुर्चीला सुरूंग लावला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांची खुर्चीच जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण नक्की काय आहे ते समजून घेवूयात. गुरुदत्त विद्या प्रसारक संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात विश्वास पाटील हे मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. संस्थेच्या संचालक मंडळाने त्यांची नियुक्ती केली होती. ते या पदावर जवळपास दहा वर्षे कार्यरत होते. पण याच संचालक मंडळाने त्यांना बेकायदेशीरपणे निलंबन केले. त्यानंतर या सर्व प्रकरणाला सुरूवात झाली.
निलंबित केल्यानंतर त्यांना त्यांचा पगार दिला नाही. त्यांचा मोठ्या प्रमाणात थकीत पगार होता. पगार मागूनही विश्वास पाटील यांनी संचालक मंडळाने काही दिले नाही. अखेर विश्वास पाटील यांनी शाळा प्राधिकरण न्यायालय नाशिक येथे वकिलामार्फत याचिका दाखल केली होती. त्यांची याचिका शाळा प्राधिकरणाने मंजूर करून त्याच्यावर सुनावणी केली. नंतर धुळे न्यायालयाने तत्कालीन मुख्याध्यापक विश्वास पाटील यांच्या बाजूने निकाल दिला होता. शिक्षण विभागाला आदेश दिले की संबंधित गुरुदत्त विद्याप्रसारक संस्थेकडून विश्वास पाटील यांचे थकीत 1 कोटी 36 लाख रुपये वेतन वसूल करून द्यावे. असे आदेशात स्पष्ट सांगण्यात आले होते. विश्वास पाटील यांच्यासाठी हा दिलासा होता. पण तसे पुढे काहीच झाले नाही.
धुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशांची पायमल्ली करत जिल्हा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. कोर्टाचा अवमान केला गेला होता. शेवटी कोर्टानेही आपला इंगा या सरकारी बाबूला दाखवला. न्यायालयाने अखेर शिक्षणाधिकारी यांच्या खुर्चीच्या जप्तीचे आदेश दिले. विश्वास पाटील यांनी आदेश प्राप्त झाल्यानंतर खुर्ची जप्तीसाठी शिक्षण अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले.
नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: E- KYC, OTP ची चिंता मिटणार, पण 'या' लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढणार
त्यांनी आपल्या वकिलांना सोबत घेऊन कायदेशीर रित्या शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्तीसाठी धाव घेतली. मात्र शिक्षण अधिकारी कामानिमित्ताने बाहेरगावी असल्यामुळे त्यांचा अतिरिक्त कार्यभार हा उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम यांच्याकडे असल्याने न्यायालयाच्या आदेशाने उपशिक्षणाधिकारी यांची खुर्ची जप्त केली. शिवाय पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली असंॲड निलेश चौधरी यांनी यावेळी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world