Dhule News: गॅस सिलिंडरसाठी राडा! लोकांचा आक्रोश, RPF जवानालाच फटकवलं, टेन्शनसह संभ्रम ही वाढला

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता सर्वसामान्यांना भोगावे लागत असल्याचे चित्र आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे 

इराण अमेरिकी इस्त्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्ध थांबेल अशी काही चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने मात्र सर्व काही सुरळीत असल्याचं सांगितलं आहे. शिवाय पुरेसा गॅस आणि तेल साठा असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्ष जमीनीवर परिस्थिती वेगळी आहे. त्याचा प्रत्येय धुळ्यात आला. गॅससाठी ऑनलाईन बुकींग बंद झालं आहे. त्यामुळे गॅससाठी एजन्सीबाहेर मोठ मोठ्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. त्यातून हाणामारीचे प्रसंगही घडल्याचं समोर आलं आहे. 

धुळे शहरात गॅस एजन्सी आहे. गॅस मिळाला म्हणून नोंदणी करण्यासाठी इथं सकाळीच भली मोठी गर्दी झाली होती. एजन्सी बाहेर मोठी रांग लागली होती. लोकांमध्ये आक्रोश होता. गॅस मिळाला पाहीजे अशी त्यांची अपेक्षा होता. त्यातून माझानंतर कसा लागेल असा सर्वांचाच प्रयत्न होता. त्यातून एजन्सी बाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. त्यात ऑनलाईन बुकींग करणारे ही होते. शिवाय तिथे जाऊन बुकींग करणारे ही होते. अशा वेळी तिथे कर्तव्यावर असलेला एक एसआरपीएस जवान पुढे सरसावला. त्याने सर्वांना नियंत्रीत करण्याचा प्रयत्न केला. 

Advertisement

नक्की वाचा - Dombivli News: इराण-अमेरिका युद्धाची झळ डोंबिवलीला; MIDC मधील 70% उद्योग बंद होणार?

मात्र लोकांमध्ये गॅस तुटवड्यामुळे आक्रोश होता. ते त्या जवानाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. लोकांचा राग वाढत होता. त्यांनी त्याचा राग त्या जवानावर काढला. सर्व नागरिकांनी त्या जवानालाच घेरलं. त्यानंतर त्याच्यावर काहींनी हात ही उचलला. त्याला जबर मारहाण करण्यात आली. शिवाय एजन्सीच्या ठिकाणाहून त्याला बाहेर ही काढण्यात आलं. त्याचा व्हिडीओ काहींनी शुट ही केला. तो व्हिडीओ ही सध्या जोरदार व्हायरल होत आहे. मात्र तिथे निर्माण झालेल्या भीषणतेची कल्पना करता येते. 

नक्की वाचा - Iran Israel War: रात्रीचा अंधार, मृत्यूचं सावट अन् भारताचं साहस! इराणमधून मुंबईत कसं आलं तेलाने भरलेलं जहाज

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता सर्वसामान्यांना भोगावे लागत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकार सर्व काही ठिक आहे. नियंत्रणात आहे असं सांगत आहे. शिवाय पुरेसा गॅस आणि तेल साठा असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. असं असताना लोकांमध्ये संभ्रम आणि असंतोष दिसून येत आहे. सरकार सांगत असलेली गोष्ट आणि ग्राऊंडवर असलेलं सत्य यात तफावत आहे का असा प्रश्न या मुळे निर्माण झाला आहे. अशा स्थितीत सरकारने खरी स्थिती काय आहे हे सांगावे अशी मागणी नागरिक करत आहे. जेणेकरून असे प्रसंग घडणार नाही. दरम्यान त्या एजन्सी बाहेर सध्या पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.