Dhule News: नागाचा बर्थडे महागात पडला! 'वाघ' पोलिसांच्या ताब्यात, वन विभागाची कारवाई

या घटनेचा व्हिडीओ तयार करून त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला. ही माहिती वनविभागाकडे पोहोचताच तातडीने कारवाई करण्यात आली.

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिनंद मोरे, धुळे: सोशल मीडियावर लाईक अन् व्हिव्यूज मिळवण्यासाठी तरुण- तरुणी नवनवे कंटेट शोधत असतात. अनेक तरुण सापांसोबत खेळताना, त्यांना पकडतानाचे व्हिडिओही व्हायरल करत असतात. असाच धक्कादायक प्रकार धुळ्यामध्ये घडला असून एका तरुणाने चक्क नागाचा वाढदिवस साजरा केल्याचे समोर आले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच त्याच्यावर वनविभागाने कठोर कारवाई केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  नागाचा वाढदिवसाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड केल्याने शिरपूर तालुक्यात एक युवक अडचणीत सापडला आहे. राज साहेबराव वाघ असे या तरुणाचे नाव असून त्याने नागपंचमी निमित्त नागाला केक खाऊ घालून वाढदिवस साजरा केला. या घटनेचा व्हिडीओ तयार करून त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकला. ही माहिती वनविभागाकडे पोहोचताच तातडीने कारवाई करण्यात आली.

UP Crime: लेकीच्या बर्थडे पार्टीत वडिलांची निर्घृण हत्या, गाण्याचा आवाज वाढवल्याने शेजाऱ्याने संपवलं

सहायक वनसंरक्षक शिरपूर व वनक्षेत्रपाल बोराडी प्रादेशिक यांनी सांगवी व बोराडी रेंज स्टाफच्या मदतीने सदर व्हिडिओ इंस्टाग्राम वर टाकणाऱ्या राज वाघ या आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्या घरातून दोन प्लास्टिक बरण्या (सर्प पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या) व एक मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्या खाली विविध कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत आरोपीने सदर नाग हा शिरपूर तालुक्यातील बुडकी गावातील घराजवळून पकडून आणला आणि नागपंचमीच्या दिवशी वाढदिवस साजरा केल्यानंतर त्याच रात्री जंगल भागात सोडल्याचे कबूल केले आहे. आरोपीस अटक करून शिरपूर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली.

Advertisement

Kolhapur News: पोलीस व्हायचं स्वप्न पण... बसमधील त्रासाला कंटाळून कॉलेज तरुणीने आयुष्य संपवलं!